पायल रोहतगीच्या बचावासाठी संग्राम सिंह ‘सरसावला’, PM मोदींना केलं ‘आवाहन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी बॉलिवुड अभिनेत्री पायल रोहतगीला अटक झाल्यानंतर तिचा सहकारी संग्राम सिंह याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. संग्राम सिंहने एक ट्विट केले असून ते गृह मंत्रालय, पीएमओ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यामध्ये अभिव्यक्तीचे हे स्वातंत्र्य आहे का? सर, कृपया यात लक्ष घाला.

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1206074851276083200

पायल रोहतगीने देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्याबाबत अतिशय आक्षपार्ह असे विधान केले होते. यानंतर राजस्थान पोलिसांनी तिला राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. ही माहिती तिनेच ट्विटरवरून दिल्यानंतर हे वृत्त वेगाने व्हायरल झाले.

पायल रोहतगीच्या विरूद्ध समाजसेवक आणि युवक काँग्रेसचे नेते चर्मेश शर्मा यांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. या तक्रारीत शर्मा यांनी म्हटले आहे की, पायल रोहतगीने तिच्या पोस्टमध्ये माजी पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांच्या मृत्यूबाबत लिहिलेल्या गोष्टींमुळे भारताच्या परराष्ट्र संबंधांवर परिणाम होऊ शकतो. तसेच ही पोस्ट धार्मिक भावना दुखावणारी आहे. तसेच राष्ट्रीय एकता आणि अखंडतेच्या विरूद्ध आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/