उर्मिला मातोंडकर नाही ही तर मरियम अख्तर मीर : पायल रोहतगी

'या' अभिनेत्रीचा व्हिडीओद्वारे हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर आता जोरदार प्रचार करीत आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने उर्मिला निवडणुकीच्या रिंगणात असून उत्तर मुंबई मतदार संघातून ती निवडणूक लढवत आहे. मात्र तिच्या राजकारणातील प्रवेशामुळे अभिनेत्री पायल रोहतगीला रुचले नाही असे दिसते आहे. तिने सोशल मीडियावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

ऊर्मिलाबाबत तिने म्हंटले आहे की, “एकेकाळी मी उर्मिला मातोंडकरची मोठी चाहती होती. एक महिला म्हणून राजकारणामध्ये प्रवेश करून उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्याच्या तिच्या निर्णयाचे कौतुक आहे. तसेच भविष्याबाबत ती स्वत: निर्णय घेत आहे याचेही कौतुक आहे. तिने आपल्या मर्जीने कश्मीरी मुलासोबत निकाह केला. त्यावेळी तिने अधिकृतरित्या आपले नाव बदलून मरियम अख्तर मीर असे ठेवले होते. उर्मिला स्वत: आपले निर्णय घेते ही चांगली गोष्ट आहे, परंतु मला फक्त एकाच गोष्टीवर हरकत असून ती चुकीच्या गोष्टी मांडत असून तिचा पक्षही (काँग्रेस) असे करत आला आहे. काँग्रेसने तिला तिकीट दिले असल्याने ती पक्षाला धोकाही देऊ शकत नाही हे रास्त आहे”, असेही ती म्हणाली.

उर्मिलाच्या ट्वीटवरही आक्षेप
उर्मिलाने एक नवीन ट्विटर अकाऊंट तयार केले असून यात तिने खोटे बोलणार नाही, महात्मा गांधींच्या विचारधारेने प्रेरित होऊन राजकारणात आल्याचे म्हटले आहे. परंतु तिने धर्म परिवर्तन केले असून आता उर्मिला मातोंडकर म्हणून नाही तर मरियम अक्तर मीर आहे, असे तिने सर्वांना सांगायला हवे, असे पायल म्हणाली. तसेच निवडणूकही हिंदू म्हणून नाही तर मुस्लिम नावाने लढवण्याचा सल्लाही तिने उर्मिलाला दिला.