पायल नव्हे ‘पागल’ रोहतगी पुन्हा बरळली ; छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिली ‘वादग्रस्त’ पोस्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  शिवाजी महाराज हे मुळ क्षत्रिय कुळातील नव्हते. तर त्यांचा जन्म शुद्र जातीतील एका शेतकरी कुटुंबात झाला होता. अशी वादग्रस्त पोस्ट बॉलिवूडमधील अभिनेत्री पायल रोहतगी हिने ट्विटरवर केली आहे. काही दिवसांपुर्वी तिने थोर समाजसुधारक राजा राममोहन राय यांच्याबद्दलही अशी वादग्रस्त पोस्ट केली होती. तिच्या या ट्वीटमुळे प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. तर सर्वच स्तरातून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे.

पायल रोहतगीने यासंदर्भातील ट्विटबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोही पोस्ट केला आहे. तर ट्विटरबरोबरच तिने इन्टाग्रामवरही ही पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हटलंय ट्विटमध्ये

शिवाजी महाराजांचा जन्म एका शुद्र वर्णाच्या कुणबी कुटुंबात झाला आहे. त्यांना पवित्र करण्याच्या समारंभ आणि त्यांच्या पत्नीचे पुनरुत्थान केल्यानंतर ते क्षत्रिय बनले. त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक झाला. म्हणून एका वर्णातील व्यक्तीने दुसऱ्या वर्णातील कौशल्ये आत्मसात केले तर त्याला त्या वर्णामध्ये स्थान दिलं जाऊ शकतं. त्यामुळे सनातन जातीवाद नाहीच.

तसेच मराठा समाजाला महाराष्ट्रात आरक्षण का दिलं. अशी मुक्ताफळं तिने उधळली आहेत.

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1134834382273994752

तर इन्स्टाग्रामवर देखील तिने याप्रकारची पोस्ट केली आहे. त्यावर आपल्या पतीसोबत आपला फोटो पोस्ट केला आहे.

https://www.instagram.com/p/ByMovg7gTC7/?utm_source=ig_web_copy_link

थोर समाजसुधारक राजा राम मोहन राय यांच्याबद्दलही मुक्ताफळं

पायल रोहतगी हिने यापुर्वी राजा राममोहन राय यांच्याबद्दलही वादग्रस्त विधान केलं होतं. तिने राजा राममोहन राय हे इंग्रजांचे ‘चमचे’ होते. असे म्हटले. इतकेच नाही तर सती प्रथेचे समर्थनही केले.

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1132105757485232128