नेहरू कुटुंबाविरूद्ध वक्तव्य केल्याबद्दल खंत वाटते का ?अभिनेत्री पायल रोहतगीनं दिलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : अभिनेत्री पायल रोहतगी यांना नेहरू कुटुंबीयांवर आक्षेपार्ह भाष्य केल्यानंतर राजस्थान पोलिसांनी अटक केली. तीला सध्या जामिन मिळाला असून ती बाहेर आहे. परंतु तिला पाच गुन्हेगारांसह १ पूर्ण रात्र तुरूंगात घालवावी लागली. जेव्हा तिला विचारले गेले की नेहरू कुटुंबाविरोधात वादग्रस्त विधान केल्याबद्दल तिला खेद वाटतो का? तर त्या अभिनेत्रीने काय उत्तर दिले जाणून घ्या.

पायलने सांगितले की तिच्या व्हिडिओला ट्विट केले गेले होते. ज्यामुळे त्यांना धक्का बसला आहे. पायल ने सांगितले की मी हे माझ्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितले की मी सार्वजनिक डोमेनकडून सर्व माहिती घेतलेली आहे. मी सांगितले की ही माहिती सर्वप्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या सेक्रेटरीच्या पुस्तकातून घेण्यात आली आहे. मी जी काही माहिती दिली ते माझे विचार नसून ते थर्ड पार्टीचे होते. व्हिडिओमध्ये कोणत्याही महिलेबद्दल कोणतीही चुकीची चर्चा नव्हती. असे स्पष्टीकरण तिने दिले.

पायल यांनी स्पष्टपणे सांगितले की जर गांधी कुटुंबाला वाईट वाटले असेल तर त्यांनी त्या स्त्रोतास लक्ष्य केले पाहिजे ज्याने सर्व माहिती सार्वजनिक क्षेत्रात ठेवली आहे. माझ्या माहितीनुसार, माझ्या व्हिडिओमुळे एफआयआर नोंदविण्यात आल्याची माहिती मिळताच मी दिलगिरी व्यक्त केली आहे. पोलिसांनी मला बोलावले तेव्हा मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली. मी पोलिसांना होईल तेवढे सहकार्य देखील केले. पायल म्हणाली की, ‘भारताचे तुकडे होतील’ अशा घोषणा देणाऱ्यांना अटक केली पाहिजे.

नागरिकता कायद्यावर पायल रोहतगी काय म्हणाल्या

पायलट रोहतगी ने सांगितले की, CAA ला लोकसभेत आणि राज्यसभेत संपूर्ण बहुमताने पास केले गेले. जर हा कायदा दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्यात आला आहे म्हटल्यावर जे लोक या कायद्याच्या विरोधात जात आहेत त्यांची संख्या कमी आहे. हे लोक कुणीही असू शकतात मग ते रोहिंग्या किंवा लिबरल गॅंग वाले किंवा अवैध प्रवासी देखील असू शकतात आपणास ते माहित नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/