Payment Aggregators | डेबिट, क्रेडिट कार्ड नंबरसह एक्स्पायरी आणि CVV सुद्धा आता ठेवावा लागेल लक्षात; RBI करतंय मोठा बदल; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Payment Aggregators | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच डेटा स्टोरेज पॉलिसीवर गाईडलाईन्समध्ये मोठा बदल करणार आहे. नवीन नियम जानेवारी-2022 पासून लागू होऊ शकतो. या नवीन नियमानंतर अनेक पेमेंट अग्रीगेटर (Payment Aggregators) आणि मर्चंट्स (merchants) जसेकी पेटीएम (Paytm), अमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart), नेटफ्लिक्स (Netflix) इत्यादी ग्राहकांच्या कार्डशी संबंधीत माहिती जमा करू शकणार नाहीत. बँक ग्राहक आणि अ‍ॅग्रीगेटरमधील महत्वाच्या दुव्याचे काम करते.

डेबिट, क्रेडिट (debit, credit) सह सीव्हीव्ही (CVV) नंबर नेहमी नोंदवावा लागेल

नियमात बदलानंतर ग्राहकांना आता प्रत्येक वेळी काही खरेदी किंवा पेटीएम-अमेझॉन सारख्या मर्चंट्सच्या मागणीवर आपल्या डेबिट-क्रेडिट कार्डचे नंबर नोंदवावे लागतील. अशावेळी आवश्यक ट्रांजक्शनच्या प्रक्रियेमध्ये संथपणा येईल आणि ग्राहकांना कार्डच्या डिटेल लक्षात ठेवाव्या लागतील किंवा पुन्हा आपल्या जवळ ठेवावा लागेल.

मात्र, या बदलांचा हेतू कार्डशी संबंधीत माहिती सुरक्षित ठेवणे आहे.
आरबीआयचा नियम जर जानेवारीपासून लागू झाला तर तो त्या ग्राहकांसाठी थोडा जड जाऊ शकतो ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त कार्ड आहे.

ई-कॉमर्स कंपन्या अजूनपर्यंत या डेटाचा वापर करूनच ग्राहकांसाठी नवीन वस्तुंना प्रमोट करत होत्या.
नव्या बदलानंतर UPI पेमेंट लोकांमध्ये जास्त लोकप्रिय होऊ शकते.

रिपोर्टनुसार आरबीआय नियमात बदल जुलैपासून करणार होती.
मात्र, यासाठी बँका अजूनपर्यंत तयार न झाल्याने तो सहा महिन्यांसाठी स्थगित करावा लागला.

Web Title : Payment Aggregators | rbi may introduce new guideline as now expiry and cvv debit credit card number to be remembered

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | वानवडी परिसरातील ‘दआरोमा स्पा’मधील घुसून तोडफोड, 2 महिलांसह चौघांविरूध्द गुन्हा

Malicious Apps | सावधान ! तात्काळ आपल्या फोनमधून DELETE करा ‘हे’ 8 अ‍ॅप, Google ने केले बॅन; जाणून घ्या लिस्ट

Olympian Footballer | ऑलम्पियन फुटबॉलर एस.एस. हकीम यांचे निधन, 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास