खुशखबर ! मोदी सरकारकडून ‘भीम’ अ‍ॅप ‘अपग्रेड’, देणार ‘Paytm’सह इतरांना ‘टक्कर’, बँकिंग व्यवहार झाले ‘एकदम’ सोपे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकारने भीमचे (BHIM) नवे वर्जन आणले आहे. यूजर्स या प्लॅटफॉर्मच्या पुढील वर्जनमध्ये अनेक बँक खात्यांना त्याबरोबर जोडण्यात आले आहे. या अँपचे पुढील वर्जन ऑक्टोबर महिण्यात येण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या आधिकाऱ्यांनी सांगितले की, भीम अ‍ॅपला अपग्रेड करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये सादर होणाऱ्या पुढील वर्जनमध्ये या अ‍ॅपच्या माध्यामातून बँक खात्यापर्यंत पोहचवणे सहज शक्य होईल.

BHIM अ‍ॅपचा वापर करणारे यूजर आपला बँक बॅलन्स देखील चेक करु शकतील आणि तुमच्या ट्रांजेक्शनच्या संबंधित महिती मिळवू शकतील. यूजर आपल्या फोन नंबरवर आधिकृत पद्धतीने पेेमेंट अड्रेस देखील देऊ शकतील. लवकरात लवकर ट्रांजेक्शन पूर्ण करण्यासाठी तुम्ही QR Code Scan देखील करु शकतात.

ज्या कोणत्याही यूजरने मोबाइल नंबर बँक खात्याला जोडला आहे ते भीम अ‍ॅपच्या माध्यमातून व्यवहार करु शकतात. जूनमध्ये भीम अ‍ॅपने जवळपास ६,२०२ कोटी रुपये मुल्याचे व्यवहार केले आहेत. WhatsApp देखील आपल्या पेमेंट सर्विसला या वर्षांच्या अंतापर्यंत भारतात लॉन्च करण्याच्या विचारात आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे भारतात जवळपास ४० कोटी यूजर आहेत. कंपनी सध्या भारतात १० लाख युजरबरोबर आपल्या पेमेंट सर्विसची टेस्टिंग करत आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, भीमचे पुढील वर्जन खासगी क्षेत्रातील पेमेंट प्लेटफॉर्मला टक्कर देणारे आहे. सध्या देशात गुगल पे, पेटीएम, अमेजॉन पे, फोन पे, HDFC, PAYZAPP इत्यादी पेमेंट अ‍ॅप आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –