विदेशात ‘प्रोसेस’ झाल्यानंतर २४ तासात डाटा भारतात आणा ; ‘व्हिसा’, ‘मास्टरकार्ड’ सारख्या कंपन्यांना ‘RBI’ची तंबी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – RBI ने स्पष्ट केले आहे की, व्हिसा, मास्टरकार्ड यांसारख्या परदेशी पेमेंट कंपन्या व्यवहाराची परदेशात प्रक्रिया करू शकतात परंतु त्यांना २४ तासाच्या आत डेटा भारतामध्ये स्टोअर करावा लागेल.

दरम्यान, RBI ने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये सांगितले होते की, सर्व परदेशी पेमेंट कंपन्यांना त्यांचा डेटा केवळ भारतातच ठेवावा लागेल कारण त्यावर व्यवस्थित लक्ष ठेवता येईल. यावरच RBI ने स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या वर्षी RBI ने निर्देश दिल्यानंतर अमेरिकेने आणि या परदेशी पेमेंट कंपन्यांनी जबरदस्त लॉबिंग केली होती. या निर्देशामुळे पेमेंट कंपन्यांच्या गुंतवणुकीला फटका बसणार होता.

परदेशी सिस्टीममधून डिलीट करावा लागेल डेटा

RBI ने सांगितले की, आम्ही आमच्या पहिल्या निर्णयावर ठाम आहोत. परंतु सोबत हे पण स्पष्ट केले की पेमेंटचे ट्रँजॅकशन बाहेरच्या देशात केले जाऊ शकते. परंतु त्याचा डेटा भारतामध्ये संग्रहित ठेवावा लागेल. जर ट्रँजॅकशन परदेशात झाले तर २४ तासाच्या आत संबंधित व्यवहाराची माहिती भारतामध्ये स्टोअर केली पाहिजे. त्याचबरोबर परदेशात असलेल्या सिस्टीममधून तो डेटा डिलीट करावा लागेल.

भारत सरकार आणि अमेरिकेच्या पेमेंट कंपन्यामधील या प्रकरणामुळे दोन्ही देशांतील व्यापारी संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. भारत डेटा स्टोरेजसाठी कडक नियम करू इच्छित आहे त्यामुळे डेटापर्यंत लवकर पोहचता येईल. RBI ने गेल्या वर्षी पेमेंट कंपन्यांना लोकल सर्व्हरवर डेटा सुरक्षित ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. याची अंमलबजावणी करण्यासाठी ६ महिन्याची डेडलाईन देखील दिली होती मात्र या डेडलाईननंतरही या सूचनेचे पालन करण्यास मास्टरकार्डसहित सर्व कंपन्या अपयशी ठरल्या.

परदेशी कंपन्या सामान्यतः  ग्लोबल सर्व्हरवर डेटा सेव्ह करते. त्यांना स्थानिक स्तरावर डेटा सेव्ह करण्यासाठी अतिरिक्त गुंतवणूक करावी लागेल.

आरोग्यविषयक वृत्त

लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय 

डायट प्लॅन करताय.. ? वापरा या टिप्स

शाकाहारी व्यक्तींनी ” प्रोटीन आणि व्हिटॅमिन ” वाढवण्यासाठी खा हे पदार्थ 

जाणून घ्या “योगा” कधी करावा

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे  

 

सिनेजगत

First Look : अभिनेता विक्‍की कौशल बनला फिल्ड मार्शल ‘सॅम मानेकशॉ’ !

अभिनेत्री मल्‍लिका शेरावतचा मोठा ‘गौप्यस्फोट’ ; म्हणाली, ‘तसं न केल्यामुळे गमावले अनेक चित्रपट’