‘या’ पेमेंट अ‍ॅपनं भारतातील आपली सर्व्हिस बंद करण्याची केली घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलीकडच्या काळामध्ये आर्थिक व्यवहार करताना कॅशलेसला अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसते. त्यासाठी विविध डीजीटल पेमेंट ॲप्सचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे समोर आले आहे. मध्यंतरीच्या काळात म्हणजे कोरोना काळामध्ये तर या डीजीटल पेमेंटचा सर्वाधिक वापर करण्यात आला आणि अजूनही तो सुरु आहे. त्यामुळे देशात डिजिटल पेमेंट युजर्स वाढत आहे. डिजिटल पेमेंटला देशातील अनेक टेक्नोलॉजी कंपन्या सुद्धा प्रोत्साहन देत आहे. मात्र आता एका डिजिटल पेमेंट अ‍ॅपने भारतातील आपली सर्व्हिस बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आपण जर या ॲपचा वापर करत असला तर तत्काळ पैसे काढून घ्या आणि अकाऊंट बंद करा.

मीडिया सोर्सने दिलेल्या माहितीनुसार, पे पल या डिजिटल पेमेंट अ‍ॅप १ एप्रिलपासून भारतातील सेवा बंद करणार आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी या ॲपचा वापर करता येणार आहे. पे पल आता बंद होणार असल्याने या ॲपच्या वापरकर्त्यांना आपले अकाऊंट बद करायचे असेल तर खालील पद्धतीचा वापर करावा.

– सर्व प्रथम पे पल वेबसाईटवर जावे त्यानंतर सेटिंगमध्ये जावे
– सेटिंगमध्ये गेल्यानंतर अकाऊंट ऑप्शनवर क्लीक करावी. यानंतर आपल्या बँकच्या अकाउंट नंबर टाका.
– नवीन पेजवर जाऊन क्लोज अकाऊंटवर क्लिक करा.
– जर तुमचे अकाउंट अशाप्रकारे बंद होणार नसेल तर तुम्ही ईमेल वरूनही हे अकाऊंट बंद करू शकता.

जगभरात जवळपास १९० देशात पे पल आपली सर्व्हिस देते. या देशात जवळपास १०० मिलियन अकाऊंट मेंबर आहेत. २०१७ मध्ये पे पलने भारतात आपली सेवा सुरु केली होती. पे पल या ॲपच्या माध्यमातून वापरकर्ते एका देशातून दुसऱ्या देशात अगदी सोप्या पद्धतीने पैसे ट्रान्सफर करु शकातात. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

जस जसे ऑनलाईन व्यवहार वाढत चालले आहे. तसे सायबर गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. क्यूआर कोडच्या मदतीने हे सायबर चोरटे पैसे उकळत आहेत. सध्या प्रत्येक ठिकाणी क्यूआर कोडचे स्कॅनिंग करत व्यवहार केले जातात. आपण जर क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करीत असाल तर वेळीच सावध होण्याची सध्या गरज आहे.

सर्वात आधी जपानमध्ये क्यूआर बनवण्यात आलं होतं. भारतात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे फसवणुकीच्या गुन्ह्यातही दिवसेंदिवस वाढत होत आहे. त्यामुळे क्यूआर कोड फिशिंग म्हणजे नेमकं काय आहे आणि यापासून कसा धोका आहे हे जाणून घेऊया.

डीजिटल देवाण घेवाणीत फसवणुकीचे सर्वाधिक प्रमाण आहे. अनेक जण स्कॅन करून पेमेंट ट्रान्सफर करीत असतात. त्याचाच सायबर चोरटे गैरफायदा घेतात. यावेळी क्यूआर कोड बदलून तसेच क्यूआर कोड टाकल्यानंतर क्यूआर कोड फिशिंग केलं जातं. त्यामुळे पैसे दुकानदाराच्या खात्यात न जाता थेट सायबर चोरट्यांच्या अकाऊंटमध्ये जातं. क्यूआर कोड फिशिंगची वेगवेगळी पद्धत आहे.