नवीन वर्षात Paytm नं केले 3 मोठे बदल, ग्राहकांवर थेट परिणाम

पोलीसनामा ऑनलाईन टीम : जर तुम्ही डिजिटल मोबाईल वॉलेट पेटीएम वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. मागील काही दिवसात पेटीएमने 3 मोठे बदल केले आहेत. याचा थेट प्रभाव ग्राहकांवर पडणार आहे.

पहिला बदल
आता तुम्हाला क्रेडिट कार्डमधून पेटीएम ई-वॉलेटमध्ये पैसे जमा करणे महागात पडणार आहे. नवीन नियमांतर्गत यूजर्स पेटीएम अ‍ॅपवर क्रेडिट कार्डवरून एक महीन्यात 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करत असेल तर त्यास 2 टक्के शुल्क भरावे लागणार आहे. यापूर्वी ही सुविधा मोफत होती. परंतु, डेबिट कार्ड आणि यूनिफाईड पेमेन्ट्स इंटरफेस (UPI) ने वॉलेट टॉप-अप केल्यास कोणतेही शुल्क लागू होणार नाही.

दूसरा बदल
मागील काही दिवसांपूर्वी पेटीएमने देशातील दुकानदारांसाठी ऑल-इन-वन क्यूआर सादर करण्याची घोषणा केली आहे. या क्यूआरद्वारे दुकानदार पेटीएम वॉलेट, रुपे कार्ड आणि सर्व यूपीआय आधारित पैस थेट आपल्या बँक खात्यांमध्ये स्वीकार करू शकतात. यास कोणतीही मर्यादा नाही. यासाठी शुल्क घेतले जाणार नाही. कंपनीने म्हटले आहे की, आपल्या पेटीएम फॉर बिझनेस अ‍ॅपद्वारे सर्व जमा रक्कम एकाच वेळी स्वीकारली जाऊ शकते.

तिसरा बदल
याशिवाय पेटीएमने एक नवी सेवा पेटीएम बिझनेस खाते सुरू केली आहे. याद्वारे दुकानदार भागीदार आपल्या ग्राहकांचे सर्व व्यवहाराचे डिजिटल खाते तयार करू शकतात. पेटीएमने नुकतेच आपल्या ग्राहकांसाठी रोज 24 तास इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) सुविधा देण्याची घोषणा केली होती. पेटीएमवर यूपीआय आणि आयएमपीएस सुविधा यापूर्वीपासूनच मिळत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/