खूशखबर ! ‘Paytm’च्या वापरकर्त्यांसाठी ‘ही’ खास सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेटीएम आपल्या ग्राहकांना अनेक विशेष सुविधा देत आहेत. आता पेटीएमने आपल्या ग्राहकांना कोणताही क्यूआर कोड स्कॅन करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे आता पेटीेएमच्या वापरकर्त्यांना कोणत्याही किराणा दुकानातून भीम यूपीआय आणि गुगल पे यांसारख्या इतर अॅपचे क्यू आर कोड स्कॅन करुन पेटीएमच्या माध्यतमातून पेमेंटची सुविधा दिली आहे.

पेटीएमच्या या सुविधेमुळे पेटीेएमचा वापर करता इतर कोणत्याही पेमेंट अॅपचा QR कोड स्कॅन करुन पेमेंट करु शकतीय. यामुळे त्यांना आता पेटीएमच्याच QR कोडची आवश्यकता लागणार नाही.

हा होणार फायदा –

पेटीएमच्या या निर्णयामुळे लहान दुकानदारांना जास्त फायदा मिळणार आहे. लहान दुकानदारांना यामुळे डिजिटल पेमेंटची सुविधेचा आधिक वापर करता येईल आणि ग्राहक देखील पेटीएमचा QR कोड नाही म्हणून परत फिरणार नाही. यामुळे दुकानदाराच्या बँक अकाऊंटला देखील थेट पैसे जमा होतील.

यावर पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिपक एबोट यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही सतत पेमेंटच्या माध्यमातून ग्राहकांना फ्लेक्सिबिलीटी देण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ग्राहक पेटीएम अॅपच्या माध्यमातून कोणताही क्यूआर कोड स्कॅन करुन पेमेंट करु शकतात. या सेवेमुळे कोणत्याही अडचणी शिवाय लगेच पेमेंट होऊ शकते. मोठ्या संख्येने लोक पेटीएम यूपीआयसोबत आपले बँक अकाउंट लिंक करत आहेत.

सध्या लोक जवळच्या स्टोअर्स, रेस्टॉरेंट, पेट्रोल पंप, हॉस्पिटल यांच्यासह विविध ठिकाणी डिजिटल पेमेंट करत आहेत. यात आम्ही पेटीएममध्ये नवनवे फिचर अॅड करत आहेत. यामुळे ग्राहकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे देखील पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक एबोट यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त