Paytm Cash Earning | खुशखबर ! Paytm देणार 50 कोटी रुपयांचा ‘कॅशबॅक’, जाणून घ्या का घेतला गेला निर्णय आणि कुणाला मिळणार लाभ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama Online) (Paytm Cash Earning) – डिजिटल पेमेंट फर्म पेटीएम (Paytm) ने आपला IPO आणण्यापूर्वी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या अ‍ॅपद्वारे व्यवसायिक आणि ग्राहकांद्वारे करण्यात येणार्‍या ट्रान्जक्शनवर कॅशबॅक (Paytm Cash Earning) देण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने 50 कोटी रुपयांचा फंड रिझर्व्ह केला आहे. डिजिटल इंडिया (Digital India) ची 6 वर्ष पूर्ण झाल्याने कंपनीने ऑनलाइन ट्रांजक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी तयारी केली आहे.

यासाठी कंपनीने 200 पेक्षा जास्त जिल्ह्यांत जमीनी स्तरावर ऑनलाइन कार्यवाही करण्याची योजना आखली आहे. जेणेकरून व्यवसायिकांना डिजिटल पेमेंट करण्याचे प्रशिक्षण देता येऊ शकते आणि कॅशलेस पेमेंट अवलंबण्यासाठी रिवॉर्ड देता येईल. कंपनी कर्नाटक, केरळ, तमिळनाडु, आंध्र प्रदेश आणि तेलंगनात (Karnataka, Kerala, Tamil Nadu, Andhra Pradesh, Telangana) विशेष अभियान राबवणार आहे.

 

पेटीएमच्या CEO ने म्हटले…

पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांनी म्हटले, भारताने आपल्या डिजिटल इंडिया मिशनमध्ये महत्वाची प्रगती केली आहे. यातून तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सर्व मजबूत होतात. पेटीएमचे गॅरेंटेड कॅशबॅक त्यांना द्यायचे आहे जे देशातील टॉपचे व्यवसायिक आहेत आणि त्यांनी डिजिटल इंडियाला यशस्वी बनवण्यात महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

 

1 जुलै 2015 ला लाँच केले होते पेटीएम

शेखर यांनी पुढे म्हटले, दिवाळीच्या अगोदर पेटीएम अ‍ॅपद्वारे सर्वात जास्त ट्रान्जक्शन करणार्‍या व्यवसायिकांना कॅशबॅकशिवाय फ्रीमध्ये साऊंड बॉक्स आणि IoT डिव्हाईस दिले जातील. डिजिटल इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 1 जुलै 2015 ला लाँच केले होते. याचा उद्देश भारताला डिजिटली मजबूत करणे आहे.

Web Titel :-  Paytm Cash Earning | good news paytm will gives you 50 crore rupees of cashback check detail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू