Paytm : तुम्हाला देखील कॅशबॅक ऑफरचा मेसेज आलाय तर व्हा सावध अन्यथा…

नवी दिल्ली : कोरोनामुळे डिजिटल व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे फसवणुकीचे प्रमाणही वाढू लागले आहे. पेटीएमवरून (paytm) फसवणूक झालयच एक नवं प्रकरण समोर आलं आहे. पेटीएमवरुन (paytm) एक बनावट, फेक मेसेज व्हायरल होत असून त्यामध्ये दोन हजार ६४७ रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जाण्याचं सांगण्यात येत आहे. मात्र मेसेज फेक असल्याचे सांगत आपल्या युजर्सला पेमेंट कंपनी पेटीएमने (paytm) सतर्कतेचा इशारा दिला आहे.

फोनवर फेक,बनावट वेबसाईटवरुन, एक मेसेज पॉपअप होत आहे, ज्यात ‘अभिनंदन, तुम्हाला पेटीएम स्क्रॅचगार्ड मिळालं आहे’ असा मेसेज दिला जात आहे. या मेसेजवर जर युजरने क्लिक केले तर, Paytm-cashoffer.com वर रिडायरेक्ट केलं जातं. दरम्यान, फसवणूक होऊ नये म्हणून सीईओ विजय शेखर यांनी युजर्सला सावध राहण्याचं सांगितलं आहे. ट्विटरवरही त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

युजरला पेटीएम स्क्रॅचगार्ड जिंकल्याचा मेसेज केला जातो. त्यावर क्लिक केल्यानंतर पुढील स्टेप्स सांगितल्या जातात. त्यानंतर युजर paytm-cashoffer.com नावाच्या साईटवर नेलं जातं. केवळ स्मार्टफोनवरच ही लिंक काम करते. खऱ्या पेटीएम सारखचं या फेक साईटचं डिझाईन आणि पॅटर्न पूर्णपणे वाटतं, त्यामुळे युजरला खरी आणि फेक साईट ओळखणंही कठीण होतं. त्याशिवाय, पैसे देण्याचं सांगून कोणी WhatsApp वर पाठवलेला क्यूआर कोड (QR code) स्कॅन करण्यासाठी सांगितला, तर वेळीच सावध व्हा. हा फसवणुकीचा प्रकार असू शकतो. त्यावर विश्वास ठेऊ नका असेही सांगण्यात आले आहे.

 

Also Read This : 

 

डोळ्याजवळील सुरकत्या दूर करण्यासाठी ‘हे’ फूड्स रामबाण उपाय, 7 दिवसांमध्ये दूर होईल समस्या

 

माझ्यामुळं सत्ता गेल्याचं फडणवीसांना दु:ख; संजय राऊतांचा माजी मुख्यमंत्र्यांना टोला

 

Remdesivir Injection : देशातील 3 मोठ्या डॉक्टरांनी सांगितले, कोरोनावर कशी करावी मात; रेमडेसिवीर ’रामबाण’ नाही

 

Pune : शहर गुन्हे शाखेतील ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍याचे तडकाफडकी निलंबन, उपायुक्तांनी केली कारवाई

Neem Juice : जेवढं कडू तेवढंच फायदेशीर, आजारांना जवळ देखील येऊ नाही देत; जाणून घ्या