Paytm ची खास ऑफर ! घराचे आणि दुकानाचे भाडे भरा अन् मिळवा 10 हजार रुपयाचा ‘कॅशबॅक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेटीएम (Paytm) एक भारतीय शॉपिंग वेबसाईट तसेच, एक भारतीय ई-कॉमर्स (E-commerce) खरेदी साइट आहे. paytm ने घरभाडे या सुविधामध्ये काही सुधारणा केल्या आहेत. घर भाडे देण्याबरोबरच दुकान, प्रॉपर्टी डिपॉजिट, टोकन रक्कम, दलाली आणि इतर भाड्याची रक्कम देता येणार आहे. paytm या सुविधेमुळे अनेक ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. तसेच सर्व असणार खर्च एकाच मार्गाने जाणार आहे. विशेष म्हणजे घरभाडे paytm द्वारे क्रेडिट कार्डवरून केल्याने तब्बल दहा हजाराचा कॅशबॅक (Cashback) सुद्धा मिळणार आहे.

घर किंवा दुकानाचे भाडे भारतात साधारणपणे सगळ्यासाठी महत्त्वाचा खर्च आहे. भाड्याची रक्कम सेवेच्या माध्यमातून ग्राहक आपल्या Debit आणि credit कार्ड, UPI आणि नेट बँकिंगचा वापर करून PAYTM च्या माध्यमातून भाडे देऊ शकतात. म्हणून ग्राहकांसाठी इतर गोष्टी सुद्धा सोप्या होतील आणि सगळा खर्च एकाच जागी एकाच मार्गाने बघण्यात येणार आहे. असे PAYTM एका प्रवक्त्यांनी सांगितला आहे.

अशा पद्धतीने करू शकता पेमेंट –
घर, प्रॉपर्टी अशा अन्य तत्वाच्या भाडे (Rent) देणाऱ्या व्यक्ती फक्त क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्याने हा कॅशबॅक मिळणार आहे.

नवीन आणि जून्या ग्राहकाला क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकेकडून सुद्धा रिवॉर्ड (Rewards) मिळणार आहे.

भाड्याची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात किंवा UPI पत्त्यावर Paytm UPI, Debit card आणि net banking वरून करता येणार आहे.

credit card वरून पेमेंट केल्यास कंपनी 1 % फी घेत आहे.

Paytm वर रेंट पेमेंट अ‍ॅक्सेस करण्यासाठी यूजर्सला होमस्क्रीनवरील Recharge & Pay Bills या सेक्शनमध्ये जाऊन Rent payment सिलेक्ट करावे लागेल.

डॅशबोर्डवर सगळे जुने रेंट पेमेंट (rent payment) ट्रॅक करणे आणि सर्व लाभार्थ्यांना एका जागेवर मॅनेज करता येणार आहे.

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण