Paytm IPO | पुढील आठवड्यात येत आहे देशातील सर्वात मोठा IPO, तुम्हाला मिळणार कमावण्याची संधी; जाणून घ्या काय आहे प्राईस बँड?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Paytm IPO | पेटीएम (Paytm) ची पॅरेंट कंपनी वन97 कम्युनिकेशन्स (One97 Communications) पुढील आठवड्यात सोमवार म्हणजे 8 नोव्हेंबरला आयपीओ (IPO) घेऊन येत आहे. पेटीएमचे प्राईस बँड (Paytm IPO price band) 2,080-2,150 रू. प्रति शेयर ठरवण्यात आले आहे. ज्याचे मूल्यांकन जवळपास 1.48 लाख कोटी होईल. तीन दिवसीय शेयर विक्री 10 नोव्हेंबरला समाप्त होईल.

 

कोल इंडियाचा विक्रम मोडणार

 

कंपनीच्या आयपीओमध्ये 8,300 कोटी मूल्याचे फ्रेश शेयर आणि सध्याच्या शेयरधारकांद्वारे 10,000 कोटीच्या ऑफर फॉर सेल (OFS) चा समावेश आहे.
हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असेल.

 

अजूनपर्यंत हा विक्रम सरकारी मालकीची कंपनी कोल इंडियाकडे (Coal india) होता.
जिने ऑक्टोबर 2010 मध्ये आयपीओतून 15,200 कोटी रुपये जमवले होते.

 

जाणून घ्या काय म्हणाले विजय शेखर शर्मा?

 

One97 Communications चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एग्झिक्यूटिव्ह डायरेक्टर विजय शेखर शर्मा (Vijay Sekhar Sharma) यांनी गुरुवारी एक प्री-IPO कॉन्फरन्समध्ये म्हटले की,
त्यांना त्या गुंतवणुकदारांकडून वैयक्तिक संदेश मिळाले आहेत जे देशात पहिल्यांदा गुंतवणुक करणार आहेत. शर्मा म्हणाले, हे भारताचे युग आहे.

 

काय म्हणातात जाणकार?

 

गोल्डमन सॅक्स इंडिया सिक्युरिटीजचे मॅनेजिंग डायरेक्टर सुदर्शन रामकृष्ण यांनी IPO बाबत माहिती देताना सांगितले की,
प्राईस बँड 2,080 रुपयांवरून 2,150 रुपये प्रति शेयरच्या दरम्यान ठरवली आहे. (Paytm IPO)

 

याचा अर्थ आहे की, कंपनीचे व्हॅल्यूएशन 19.3 अमेरिकन डॉलरवरून 19.9 अरब अमेरिकन डॉलर होईल.
सध्याच्या एक्सचेंज रेटवर, कंपनीचे व्हॅल्यूएशन 1.44 लाख कोटी रुपयावरून 1.48 लाख कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.

 

हे भारताचे युग आहे

 

शर्मा यांनी म्हटले की, जर आपण म्हणतो की, 2010-20 व्यापक प्रकारे आशियाचे, चीन आणि जपान आणि इतर देशांचा काळा होता तर 2020-30 पूर्णपणे भारताचा काळ आहे.
हे भारताचे युग आहे. मग ती एखादी प्रायव्हेट कंपनी असो, स्टार्टअप असो, लिस्ट झालेली कंपनी असो किंवा लिस्ट होऊ पहात असलेली कंपनी असो.
हा तो काळ आहे जेव्हा जग तुम्हाला पैसे देण्यासाठी पुढे येत आहे. (Paytm IPO) OFS मध्ये शर्मा आपले 402.65 कोटी रुपयांपर्यंत, AntFin (नेदरलँड्स) होल्डिंग्ज 4,704.43 कोटी रुपयांपर्यंत,
अलीबाबा डॉट कॉम सिंगापुर ई-कॉमर्स 784.82 कोटी रुपयांपर्यंत आणि एलिव्हेशन कॅपिटल व्ही एफआयआय होल्डिंग्ज 75.02 कोटी रुपयांपर्यंतच्या आपल्या शेयरची विक्री करतील.

 

Web Title : Paytm IPO | paytm ipo will launch next week 8 nov after diwali check issue price band other details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Uddhav Thackeray | बारामतीमध्ये CM उद्धव ठाकरे यांचा भाजपवर ‘निशाणा’; म्हणाले – ‘युतीमध्ये 25 वर्षे अंडी उबवली’

Anil Deshmukh | विदर्भातील उमद्या नेत्याची कारकीर्द अटकेने ‘काळवंडली’

Anil Parab | अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचा नंबर; भाजपच्या दोन मंत्र्यांचा दावा