RBI’ नंतर ‘Paytm’ चा ‘PMC’ बँकेच्या ग्राहकांना झटका, बंद केल्या ग्राहकांच्या ‘या’ सेवा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँकेवर आरबीआयने 24 सप्टेंबरला एक सूचना जारी करुन सहा महिन्यासाठी पैशांच्या व्यवहारावर प्रतिबंध लावले. यानंतर पीएमसी बँक ना कोणत्याही प्रकारचे कर्ज कोणाला देऊ शकणार ना कोणत्याही ग्राहकांना 25,000 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेतून काढता येणार. या बँकेत झालेल्या घोटाळ्याचा तपास ईडी करत आहे. यानंतर आता या बँकेच्या ग्राहकांना Paytm ने झटका दिला आहे.

पेटीएमने बँकेच्या लाखो ग्राहकांना सूचना पाठवल्या आहेत. पेटीएमने 4 ऑक्टोबरला एक ट्विट करत माहिती दिली. ही नोटीस त्या पीएमसी बँकेच्या ग्राहकांना देण्यात आली आहे, ज्यांनी पेटीएमच्या माध्यमातून काही गुंतवणूक केली आहे.

 

1. पेटीएमने सांगितले की त्यांनी पीएमसी बँकेतून होणाऱ्या सर्व ऑटो पेमेंट सिस्टिमला बंद केले आहे. यानंतर आता सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन (SIP) चे पेमेंट वेळेवर होणार नाही.

2. पेटीएमने सांगितले की त्यांनी नेट बँकिंग आणि यूपीआयच्या माध्यमातून होणारे पेमेंट देखील पीएमसी बँकेच्या ग्राहकांसाठी बंद केले आहेत.

3. पेटीएमने आपल्या ग्राहकांना विनंती केली आहे की त्यांनी पीएमसी बँके व्यतिरिक्त इतर बँक खाते पेटीएमला लिंक करावे. पेटीएम जवळपास 200 पेक्षा जास्त बँकांना सपोर्ट करते. नवे खाते 30 मिनिटात वेरिफाय करण्यात येते.

4. पेटीएम यूजर्स नव्या बँक खात्याला लिंक करुन आपली एसआयपी व इतर गुंतवणूकीत पैसे टाकू शकतात. त्यानंतर ते नेट बँकिंग आणि यूपीआय सेवाचा देखील लाभ घेऊ शकतात.

शशिकांत दास यांनी सांगितले की घाबरण्याची काही गरज नाही –
आरबीआय गर्व्हनर शशिकांत दास यांनी सांगितले की आरबीआयचा विचार केला तर स्पष्ट करु इच्छितो की आपली बँकिंग व्यवस्था मजबूत आणि सुस्थितित आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.

अफवांवर विश्वास ठेवू नका –
शशिकांत दास यांनी सल्ला दिला की अफवांवर लक्ष देऊ नका, घाबरण्याची गरज नाही. ते म्हणाले की पीएमसी बँकेच्या प्रकरणी आरबीआयकडून माहिती देण्यात आली आहे. लवकरात लवकर कारवाई पूर्ण करण्यात येईल. अशा घटनेने कोणत्याही इतर सहकारी बँकांच्या सुरक्षेबद्दल संशय व्यक्त करुन चालणार नाही. ते म्हणाले की आरबीआय सहकारी बँकेच्या विनिमय व्यवस्थेची पूर्ण समीक्षा करेल आणि गरजेनुसार सरकारबरोबर चर्चा करेल.

Visit : Policenama.com