Paytm Jobs 2021 | खुशखबर ! Paytm 35 हजार रूपये पगारावर देणार 20 हजार अंडर ग्रॅज्युएट्सना नोकरी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशातील सर्वात मोठी डिजीटल पेमेंट सोल्यूशन कंपनी (Digital payment Solution Company) पेटीएम (Paytm jobs 2021) दिवाळीपूर्वी तब्बल 16,600 कोटी रुपयांचा आयपीओ (IPO) आणणार आहे. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असल्याचे बोलले जात आहे. आयपीओ आणण्यापूर्वी कंपनी पूर्णपणे तयारी करत आहे. यासाठी पेटीएम आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे. त्यानुसार पेटीएममध्ये 20 हजार तरुणांची (Paytm jobs 2021) पदभरती केली जाणार आहे.

या पदासाठी होणार भरती

पेटीएम 20 हजार फिल्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह (field sales executives) नेमणूक करण्याचा विचार करत आहे. फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह व्यापारी आणि यूजर्सना डिजिटल सेवांचं शिक्षण देतील आणि कंपनीच्या विविध डिजिटल उत्पादनांचा प्रचार (Promoting digital products) करतील. त्यामुळे यासाठी टेक्नॉलॉजी (Technology) समजणाऱ्या तरुणांची गरज कंपनीला आहे.

कोण करु शकतो अर्ज

ज्या उमेदवारांचे वय 18 वर्षे पूर्ण आहे आणि 10 वी, 12 वी किंवा पदवीधर आहेत असे उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. इच्छुक उमेदवार अँड्रॉइड स्मार्टफोनमधून पेटीएम अ‍ॅप वापरुन अर्ज करु शकतात. ज्या उमेदवारांकडे दुचाकी आहे अशांना प्राधान्य दिलं जाणार आहे. अर्जदारांना स्थानिक भाषा आणि प्रदेशाची चांगली माहिती असणे आवश्यक आहे.

एवढी मिळणार सॅलरी

निवड झालेल्या फिल्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह यांना दरमहा 35 हजार रुपये पगार असणार आहे.
पेटीएमने पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एफएसई कार्यक्रम सुरु केले आहे.
यानुसार लवकरच ही भरती होणार आहे.

Web Title : Paytm Jobs 2021 | paytm will open 20 thousands jobs after diwali for youth

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jayant Patil | अस्वस्थ वाटू लागल्यानं जयंत पाटलांनी कॅबिनेटची बैठक अर्धवट सोडली, ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

Western Railway | रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ! पश्चिम रेल्वे मुंबईमध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार

Unwanted Pregnancy | गर्भनिरोधक गोळी घेण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या