Paytm नं 211 टोल प्लाझावर लॉन्च केली ऑटोमेटिक पेमेंटची सुविधा, तुम्हाला मिळतील ‘हे’ फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिजिटल पेमेंट अ‍ॅप पेटीएमच्या पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने ( PPBL ) देशभरातील 211 टोल प्लाझावर आपली ‘ऑटोमॅटिक कॅशलेस पेमेंट’ सुविधा जाहीर केली आहे. असे करून, बँक राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल संकलन कार्यक्रमांतर्गत सर्वात मोठी संकलन करणारी कंपनी बनली आहे. तसेच, देशातील फास्टटॅग देणारी ही सर्वात मोठी कंपनी बनली आहे, ज्यामध्ये देशभरात 50 लाख वाहने जोडलेली आहेत. ही सुविधा आणखी 100 टोल प्लाझावर जारी करण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे, जेणेकरून येत्या तीन महिन्यांत फास्टटॅग विक्रीत 100 टक्के नोंदणी होऊ शकेल.

पेटीएम वॉलेटमधून आपोआप वजा केली जाईल फी
फास्टटॅग जारी करणार्‍या बँकांप्रमाणे पेटीएम वरून पेटीएम फास्ट टॅगसाठी स्वतंत्र खाते तयार करण्याची आवश्यकता नाही. यात टोल प्लाजावर पेटीएम वॉलेटमधून आपोआप पैसे वजा केले जातील. ही सुविधा वाहन नोंदणी क्रमांक आणि प्रमाणपत्र (आरसी) द्वारे वापरली जाऊ शकते. तसेच, ती कोणत्याही डिलिव्हरी फीशिवाय वापरकर्त्याच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोहोचविण्याची सुविधा आहे.

प्लाझावर नाही करावी लागणार प्रतीक्षा
पेटीएमने या विस्तारासाठी देशभरात 20 हजार कॅम्प उभारली आहेत. यामध्ये देशातील रहिवासी पार्किंग, इंधन स्टेशन आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांचा समावेश आहे. फास्टटॅग प्रक्रियेत वाहनधारकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल. यामुळे वाहनचालकांना टोल प्लाझावर शुल्क भरण्यासाठी गाड्यांच्या लांबलचक रांगेत उभे राहावे लागणार नाही.

केंद्राच्या ‘डिजिटल इंडिया मिशन’ला पुढे नेत आहोत
पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सतीशकुमार गुप्ता म्हणाले, ‘आम्ही देशात डिजिटल टोल पेमेंटची प्रक्रिया अवलंब करण्यास बांधील आहोत आणि रस्त्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी आणि लोकांचा वेळ वाचविण्यासाठी आम्ही विस्तार करीत आहोत. आम्हाला वापरकर्त्यांचा जबरदस्त प्रतिसादही मिळत आहे, ज्यामुळे आमची कंपनी देशातील सर्वात मोठी फास्टटॅग जारी करणारी कंपनी बनली आहे. या मिशनसह आम्ही सरकारच्या ‘डिजिटल इंडिया मिशन’ ला पुढे नेत आहोत. आम्ही लोकांना देशात कॅशलेस पेमेंटवर प्रक्रिया करण्यास प्रोत्साहित करीत आहोत.

You might also like