फायद्याची गोष्ट ! Paytm ची ग्राहकांसाठी खास ऑफर; ‘या’ कार्ड्सवर 75 हजार रुपयांपर्यतचे फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पेटीएम ने आता ग्राहकांसाठी एक खास आणि महत्वाची ऑफर आणली आहे. तर हि ऑफर दोन कार्डाद्वारे मिळणार आहे. हे कार्ड आहेत. Paytm ने SBI कार्डासमवेत पार्टनरशिपमध्ये दोन क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. एक म्हणजे Paytm SBI Card आणि दुसरं Paytm SBI Select Card होय. तर याच्या खास ऑफरसंदर्भात सविस्तर माहिती आपणाला paytm app वर मिळणार आहे.

गेल्या आठवड्यातच RBIने काही नवीन घोषणा केल्या आहेत. Payments Bank, Prepaid Payment Instrument आणि इतर डिजिटल वित्तीय सेवांच्या बाबत हे महत्वपूर्ण निर्णय आहेत. यापुढे या कंपन्यांनादेखील RTGS आणि NEFT सेवा पुरवण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी केवळ बॅंकांनाच या सेवा पुरवण्याची परवानगी होती. या सेवा RBI च्या अधिकृत येतात. तर जाणून घ्या काय आहे ऑफरबाबत प्रक्रिया.

असे असणार ऑफर्स –

या लॉन्च केलेल्या कार्ड्सवर अमर्यादित ५ टक्क्यांपर्यत कॅशबॅक मिळणार आहे. या कार्ड्सद्वारे ७५ हजार रुपयांपर्यत फायदा Paytm देणार आहे. यामध्ये पेटीएम प्रथम सदस्यत्वसमवेत फायदा मिळणार आहे. याव्यतिरिक्त paytm app वर स्मार्ट फीचर्स वापरून ग्राहक त्यांचे कार्डाचे व्यवस्थापन करू शकणार आहे.

किती मिळेल कॅशबॅक?

–  यामध्ये पेटीएम मॉल, चित्रपट आणि प्रवासावर ५ टक्क्यांपर्यतचा कॅशबॅक या कार्डवर मिळणार आहे.

–  याव्यतिरिक्त paytm app वर करण्यात येणाऱ्या खर्चावर ग्राहकाला २ टक्के कॅशबॅक मिळणार.

–  अन्य खर्चांवर ग्राहकाला १ टक्का कॅशबॅक मिळतो.

–  यानंतर वॉलेट लोड्स आणि फ्युएल वर होणाऱ्या खर्चावर ग्राहकाला कॅशबॅक मिळणार नाही.

–  ग्राहकाचा कॅशबॅक त्याच्या paytm गिफ्ट व्हाऊचर बॅलन्समध्ये जोडला जाणार आहे. या कॅशबॅकला ग्राहक paytm app किंवा ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्टोअरवर रिडिम करू शकणार आहे.

–  कंपनी कॉम्प्लिमेंटरी एअरपोर्ट लाऊंज अ‍ॅक्सेसदेखील देते आहे. यामध्ये ग्राहक प्रतिवर्षी ४ घरगुती लाऊंज व्हिजिट करू शकतो.

दोन लाखांपर्यतचा फ्रॉड विमा –

Paytm SBI Card समवेत एक लाख रुपयांचा सायबर फसवणूक विमा (Cyber fraud insurance) मिळणार आहे. तर Paytm SBI सिलेक्ट कार्डवर दोन लाख रुपयांचा फ्रॉड इन्श्युरन्स मिळणार आहे.

असा करा अर्ज –

तुम्हाला Paytm च्या लेटेस्ट आवृत्तीवर जाऊन या कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. हे करण्यासाठी Paytm ने अर्ली अ‍ॅक्सेस कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये Paytm SBI कार्ड आणि सिलेक्ट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी खास अ‍ॅक्सेस दिला जातो. यामध्ये दाखल होण्यासाठी ग्राहकांना आपली काही माहिती Paytm अ‍ॅपमध्ये द्यावी लागते. Paytm SBI कार्डवर ग्राहकाला वर्षाचे ४९९ रुपये फी द्यावे लागणार आहे. तसेच Paytm SBI सिलेक्ट कार्डवर १,४९९ रुपयांचे वार्षिक फी द्यावे लागणार आहे.

सध्या डिजिटल वित्तीय सेवा पुरवणाऱ्या कंपन्यामध्ये मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे या कंपन्या विविध ऑफर्स ग्राहकांसाठी आणत असतात. त्यातच Paytm ही आघाडीची कंपनी आहे. Paytm ने विविध आर्थिक सेवा बाजारात आणल्या आहेत. या पेमेंट कंपन्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून आता विविध बॅंकादेखील त्यांच्यासोबत संयुक्तरित्या बाजारात विविध ऑफर्स लॉन्च केले जात आहे.