Paytm सारख्या वॉलेटमधून सुद्धा खरेदी करू शकता ‘इश्यू’, SEBI ने दिली परवानगी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Paytm | जर तुम्हाला Payment Bank द्वारे राईट इश्यूमध्ये पैसे लावायचे असतील तर आता असे होऊ शकते. कारण भांडवल बाजार नियामक Sebi ने पेमेन्ट बँकांना गुंतवणूक बँकर (Investment Banker) म्हणून काम करण्याची परवानगी दिली आहे. या उपक्रमाचा हेतू पेमेन्टच्या सर्व माध्यमांचा वापर करून गुंतवणुकदारांसाठी सार्वजनिक आणि राईट्स इश्यू (Public and Rights Issue) मध्ये भागीदारी सोपी बनवणे आहे.

भारतीय सुरक्षा आणि विनिमय बोर्ड (Sebi) ने एका सक्युर्लरमध्ये म्हटले आहे की ज्या विना-अनुसूचित पेमेन्ट बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) अगोदर परवानगी आहे, त्या इश्यूसाठी बँकर (Banker to issue-BTI) म्हणून काम करण्यास पात्र असतील.

बँक सिंडिकेट म्हणून काम करण्यास परवानगी

हे BTI नियमांमध्ये निर्धारित अटी पूर्ण करण्यावर अवलंबून आहे. सोबतच BTI म्हणून रजिस्टर्ड Payment Banks असलेल्या स्वप्रमाणित बँकांना सिंडिकेट म्हणून काम करण्याची परवानगी असेल. हे सेबीद्वारे या संदर्भात निर्धारित मापदंडांवर अवलंबून असेल.

बचत खात्यात जमा रक्कम

Sebi ने म्हटले की, गुंतवणूकदारांकडून जारी करण्यासाठी जी सुद्धा रक्कम ब्लॉक केली जाईल, ती गुंतवणुकीसाठी पाठवली जाईल, तर गुंतवणूकदारांच्या पेमेन्ट बँकेच्या बचत खात्यात जमा रक्कमेतून झाली पाहिजे.

BTI नियमांमध्ये दुरूस्ती

Sebi ने 30 जुलैला जारी अधिसूचनेत BTI नियमांमध्ये दुरूस्ती केली.
याद्वारे इतर बँक युनिटना जारी करण्यासाठी बँकर हालचालींमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या बँकिंग युनीट्समध्ये त्या कंपन्या सहभागी होतील, ज्यांना सेबीने वेळोवेळी सांगितले आहे.

Web Title : Paytm | loan sebi market regulator allows payments banks to act as investment bankers

eAadhaar | आधारसोबत नसताना कसे पूर्ण होईल बँकिंगपासून तिकिट घेण्यापर्यंतचे प्रत्येक महत्वाचे काम, UIDAI ने दिली मोठी अपडेट

Crime News | इमारतीवरून नवजात बालिकेला खाली दिले फेकून;
विरारमधील धक्कादायक घटना

‘कंगाल’ झालाय पाकिस्तान ! इस्लामाबादमध्ये पंतप्रधान निवासस्थान
भाड्याने देण्याची केली घोषणा

Gold Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर