Paytm कडून ग्राहकांना जबरदस्त ऑफर ! 99 रूपयांमध्ये Redmi चा मोबाईल खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – सणानिमित्त अनेक ई-कॉमर्स कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर देत आहेत. पेटीएमने देखील दिवाळीची संधी साधून आपल्या ग्राहकांना एकापेक्षा एक अशा ऑफर दिल्या आहेत. ज्यात पेटीएम यूजर्स 99 रुपयांत रेडमीचा फोन खरेदी करु शकतात. Paytm ने फेस्टिवल ऑफर देण्यासाठी महाकॅशबॅक सेल सुरु केला आहे. हा सेल 29 सप्टेंबरपासून सुरु होईल. जो 6 ऑक्टोबर पर्यंत चालेल. तुमच्या पसंतीचे अनेक फोन तुम्हाला येथे स्वस्तात मिळतील. तुम्ही 1 रुपयांत बजेट फोन देखील पेटीएमवरुन खरेदी करु शकतात.

पेटीएमने Cracker Deals देखील सुरु केले आहे. याअंतर्गत 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर या दरम्यान प्रत्येक संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत काही फोन कमी किंमतीत खरेदी करु शकतात. या ऑफर अंतर्गत तुम्हाला कॅश म्हणजेच थेट कोणताही लाभ मिळणार नाही. तर तुम्हाला कॅशबॅक देण्यात येईल. म्हणजेच तुम्ही फोन खरेदी करा तो तुम्हाला पूर्ण किंमतीला खरेदी करावी लागेल, यानंतर पेटीएम यूजर्सला कॅशबॅकच्या माध्यमातून ऑफर असलेल्या किंमतीवर कॅशबॅक देईल.

एवढेच नाही तर सेलच्या दरम्यान पेटीएमवर स्मार्टफोन खरेदी केल्यास काही बँक ऑफर्स मिळतील. ज्या आधारे 5,000 रुपयांपेक्षा जास्तच्या खरेदीवर HDFC बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डधारकांना 10% इंस्टेेंट डिस्काउंट मिळेल, ही ऑफर ईएमआय ट्रांजेक्शनवर उपलब्ध असेल.

याशिवाय ग्रँड मोबाइल सेल मध्ये सॅमसंग, वीवो, शिओमी एमआय, ओप्पो, अ‍ॅप्पल सारख्या ब्राँड च्या फोनवर यूजर्सला मोठे डिस्काउंड मिळेल, स्मार्टफोनच्या खरेदीवर यूजर्सला 10,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि 17,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येईल.

isit : Policenama.com