Paytm द्वारे समजेल तुम्हाला कर्ज मिळेल की नाही, 1 मिनिटापेक्षा कमी वेळात तपासा ‘क्रेडिट’ स्कोर, जाणून घ्या
नवी दिल्ली : मोबाइल वॉलेट अॅप पेटीएमने गुरुवारी आपल्या प्लॅटफॉर्मवर सिबिल स्कोर चेक करण्याची सुविधा लाँच केली आहे. पेटीएम अॅपवर ही सुविधा फ्री असेल. युजर्स डिटेलमध्ये आपला रिपोर्ट पाहू शकता. अॅक्टिव्ह क्रेडिट कार्ड आणि लोन अकाऊंटचा क्रेडिट रिपोर्ट आता पेटीएम अॅपवर पाहता येईल. याशिवाय युजर्स शहर, राज्य किवा नॅशनल लेव्हलवर क्रेडिट रेटिंग्सची तुलना करू शकतील. या पूर्ण प्रक्रियेला केवळ तीन स्टेप्समध्ये पूर्ण केले जाऊ शकते आणि यासाठी 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागेल.
क्रेडिट रिपोर्टशिवाय मिळेल ही माहिती
याशिवाय पेटीएम अॅपमध्ये यूजर्ससाठी स्पेशल क्रेडिट एज्युकेशन सेक्शन सिस्टमसुद्धा देण्यात आली आहे. जेथे त्यांना क्रेडिट स्कोरबाबत अनेक प्रकारची माहिती देण्यात येत आहे. यामध्ये म्हटले आहे की, सिबिल स्कोर कसा चांगला करता येऊ शकतो, कशाप्रकारे रिपोर्ट समजून घ्यावा. लोन घेण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि चांगला क्रेडिट स्कोरचे काय फायदे आहेत.
काय असतो क्रेडिट स्कोर?
सिबिल किंवा क्रेडिट स्कोर एक प्रकारचा फायनान्शियल रिपोर्ट आहे. सिबिल स्कोर 3 डिजिटचा एक नंबर असतो, जो 300 ते 900 दरम्यान असतो आणि यातून एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिटच्या आरोग्याची माहिती मिळते. सिबिल स्कोरपेक्षा चांगली क्रेडिट हिस्ट्री आणि जबाबदार रिपेमेंटच्या सवयीची माहिती मिळते. सोबतच, चांगल्या क्रेडिट स्कोरच्या मदतीने कर्ज घेणे सोपे जाते.
जर एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर त्याच्या लोनची मंजूरी सहज मिळते आणि लोन प्रोसेसिंग सुद्धा लवकर पूर्ण होते. जर एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर 750 किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर त्यास कर्ज मिळणे सोपे होते. क्रेडिट स्कोरमध्ये मागील 24 महीन्यांची क्रेडिट हिस्ट्री सहभागी असते.
कोणत्या गोष्टींवर ठरतो क्रेडिट स्कोर?
चांगला क्रेडिट स्कोर तयार करण्यासाठी काही आवश्यक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. वेळेवर कर्ज चुकवण्यासाठी क्रेडिट स्कोरमध्ये 30 टक्के हिस्सा असतो. सिक्युर्ड किंवा अनसिक्युर्ड लोनचा 25 टक्के हिस्सा असतो. सिक्युर्ड लोनमध्ये कार लोन किंवा होम लोनचा सहभाग असतो. तर, अनसिक्युर्ड लोनमध्ये पर्सनल लोन इत्यादी आहे. क्रेडिट स्कोरमध्ये क्रेडिट एक्सपोजर 25 टक्के असते. तर, कर्जाच्या वापरासाठी क्रेडिट स्कोरमध्ये 20 टक्केचा सहभाग असतो.
पेटीएम अॅपवर असा पहा आपले क्रेडिट/सिबिल स्कोर
1 प्रथम पेटीएम अॅपमध्ये लॉगिन करा. नंतर होम स्क्रीनवर मोअर आयकॉन वर टॅप करा.
2 या आयकॉनवर टॅप केल्यानंतर पॅन कार्ड नंबर आणि डेट ऑफ बर्थ भरा आणि सबमिट करा. जर नवीन युजर असाल तर प्रोफाईल व्हेरिफिकेशनसाठी एक ओटीपी पाठवला जाईल.
3 या व्हेरिफिकेशन प्रोसेसनंतर तुम्ही सहजपणे क्रेडिट/सिबिल स्कोर पाहू शकता. यासाठी कोणतेही शुल्क नाही. तसेच यासंबंधी माहिती सुद्धा येथे मिळू शकते.
सिबिल स्कोरमध्ये अशी सुधारणा करा
चांगल्या क्रेडिट स्कोरसाठी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. क्रेडिट कार्डच्या पूर्ण लिमिटचा वापर करू नका. क्रेडिट कार्डपेक्षा जास्त लोन घेऊ नका. एकच वेळी अनेक ठिकाणी कर्जासाठी अर्ज करू नका. होम लोन आणि ऑटो लोनला महत्व द्या. पर्सनल लोन शक्यतो टाळा. क्रेडिट कार्ड बंद करणे टाळा. ज्वॉईंट अकाऊंट खात्यांचे परिक्षण करा. सिबिल स्कोर तपासत राहा.