Paytm Money सुरु करणार आता नवीन इनोव्हेशन सेंटर; ‘या’ लोकांना मिळतील नोकऱ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Paytm Money आता पुण्यात तंत्रज्ञान विकास आणि नवीन केंद्र सुरु करण्याचा विचार करीत आहे. यासाठी कंपनी मोठ्या संख्येने रोजगारही उपलब्ध करून देणार आहेत. कंपनीने गुरुवारी याबाबत माहिती दिली. Paytm Money २५० पेक्षा जास्त फ्रंट-एन्ड, बॅक-एन्ड अभियंता आणि डेटा सायंटिस्टला नवीन वेल्थ प्रोडक्ट्स आणि सर्व्हिससाठी नोकरी देणार आहेत. कंपनीने एका निवेदनात म्हंटले की, ”Paytm Money रिटेल गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक आणि संपत्ती निर्माण करणे सुलभ करण्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि पुण्यात नवीन सेवा उत्पादनाच्या नाविन्यास, विशेषतः इक्कीटी, म्युचुअल फंड आणि डिजिटल गोल्डसाठी”.

कंपनी काय म्हणाली जाणून घ्या?
Paytm Money चे सीईओ वरुण श्रीधर यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीला महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी इंजिनिअरिंगच्या सशक्त प्रतिभेची आवश्यकता आहे. ते म्हणाले, ”आम्ही आमच्या ग्राहकांसाठी कमी किंमतीच्या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आणि एक ठोस, नाविन्यपूर्ण आणि स्थिर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु ठेवू.”

पुणे इनोव्हेशन सेंटर होण्याकरिता वाटचाल करीत आहे
वरुण श्रीधर म्हणाले, ”पुणे उच्च गुणवत्तेच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे, तसेच चांगल्या पायाभूत सुविधां आणि उत्कृष्ट प्रतिभा प्रदान करते. आमचे असे म्हणणे आहे की पुणे फिनटेकसाठी एक इनोव्हेशन सेंटर बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि मनीच्या विस्तार योजनांसाठी Paytm हा ही एक पर्याय आहे.

मार्चमध्ये १.४ बिलियन डिजिटल पेमेंट व्यवहार
डिजिटल पेमेंट कंपनी Paytm ने सोमवारी सांगितले की त्यांचे मासिक डिजिटल पेमेंट व्यवहार १.४ अब्जांवर गेले आहेत. ऑफलाईन पेमेंट्स आणि वित्तीय सेवांमध्ये वाढ झाल्यामुळे हा आकडा गाठण्यात यश आले आहे, असा कंपनीचा दावा आहे. Paytm ने गुरुवारी सांगितले की मार्चमध्ये त्यांनी १.४ अब्जाहून अधिक मासिक व्यवहार केले आहेत, त्यामुळे ऑफलाईन देयके आणि वित्तीय सेवांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Paytm चे उपाध्यक्ष नरेंद्र यादव यांनी निवेदनात म्हंटले आहे की आमच्या वापरकर्त्यांनी मोठया संख्येने Paytm सोबत डिजिटल प्रवास सुरु केला. आता त्यांनी आमच्या आर्थिक सेवा स्वीकारल्या आहेत. यादव म्हणाले की, स्ट्रीट फेरीवाले, छोटे दुकानदार आमच्या साउन्डबॉक्सला स्वीकारत आहेत, ज्यामुळे डिजिटल पेमेंटवर अवलंबून राहण्यास मदत झाली आहे, कारण आता त्यांना प्रत्येक पेमेंटची पुष्टी मिळते.