लहान व्यापार्‍यांसाठी खुशखबर ! आता मिळणार एका क्लिकवर Paytm कडून ‘इंस्टंट लोन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोबाइल वॉलेट कंपनी पेटीएम आपला उद्योग वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनी लवकरच कर्ज देण्याचा व्यवसाय सुरु करणार आहे. यासाठी कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी ‘Clix Finance India’ बरोबर करार केला आहे. या करारात ‘MSME’ आणि ‘सेल्फ एंप्लॉईड’ लोकांना कर्ज देण्यात येईल.

काय आहे Clix

Clix ही एक डिजिटल लेंडिंग NBFC आहे. यानंतर Paytm आता ग्राहकांना पेटीएम मर्चेंट्सला ‘इंस्टेंट डिजिटल कर्ज’ देण्यात येईल. पेटीएमचे मुख्य लक्ष सेल्फ एंप्लॉयड आणि पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्या लोकांना कर्ज देण्यात येईल ज्यांना बँकेत कर्ज मिळत नाही. पेटीएमने clix शिवाय टाटा कॅपिटल आणि इंडिफाई बरोबर करार केला आहे.

पेटीएमने सांगितले की ते आपल्या ग्राहकांना आणि मर्चेंट्सने डेफर्ड पेमेंट किंवा पोस्ट पेडची सुविधा देखील देणार आहे. पेटीएम आणि clix ला अपेक्षा आहे की येणाऱ्या काही महिन्यात अनेक प्रोडक्ट्स लॉन्च करणार आहे. पेटीएम ने सांगितले की कंपनीला पोस्टपेड आणि मर्चेंड लेंडिंग प्रोडक्ट्ससाठी चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे.

याचा फायदा छोट्या व्यापाऱ्यांना होणार आहे. यात ते त्यांच्या व्यापारासाठी आवश्यक वेळी कर्ज घेऊ शकतात. यामुळे आता व्यवसायिकांना देखील मोठा फायदा मिळणार आहे आणि कर्ज घेण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त