Paytm च्या वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी ! पेमेंट करताना द्यावा लागणार नाही चार्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनाच्या या संकटकाळात पेटीएमने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाशी संबंधित सर्व लोनवर आता कोणतेही ट्रान्जक्शन शुल्क आकारले जाणार नाही अशी घोषणा केली आहे. देशातील सर्व नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना व्यवहारासाठी 0 % शुल्क राहील असे कंपनीने म्हटले आहे. ही सुविधा पेमेंट गेटवेवरून दिली जात असून यामुळे पेमेंट करणे सोपे होईल. तसेच कोरोना काळात कोणताही व्यत्यय न येता कामे सुरळीतपणे सुरू राहतील, असे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान कंपनीने कोरोना लस स्लॉट शोधण्यासाठी नवीन टूल Paytm Vaccine Slot Finder लाँच करण्याची घोषणा केली आहे.

पेटीएम कंपनीने म्हटले आहे की, देशातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना कंपनी पेमेंट गेटवे सेवा प्रदान करीत आहे, ज्या संस्था कोरोनाच्या काळात लोकांना मदत करत आहेत. दरम्यान गेल्या काही आठवड्यांत पेटीएम पेमेंट गेटवेकडून स्वयंसेवी संस्थांना दान म्हणून दिलेल्या निधीत 400% वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

काय आहे पेटीएम गेटवे सुविधा ?
तुम्ही Paytm अॅपद्वारे वीज, पाणी आणि मोबाइल बिले ऑनलाईन पेमेंट करता, ते गेटवेद्वारे केले जाते. याशिवाय, गेटवेचा वापर कार्ड तपशील भरण्यासाठीही केला जातो. तसेच ऑनलाइन पेमेंटची प्रक्रिया सुलभ होते. या व्यतिरिक्त, ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी तुमच्या डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती पेमेंट गेटवेला कन्फर्मेशनसाठी पाठविली जात असते.