Paytm चा शेयर 450 रुपयांपर्यंत घसरणार की 1300 रुपयांपर्यंत वाढणार? जाणून घ्या ब्रोकरेज हाऊसेसचे मत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Paytm | मागील सहा महिन्यांत डिजिटल पेमेंट अ‍ॅप पेटीएमचा स्टॉक खूप चर्चेत आहे. गुंतवणूकदारांना Paytm ची मूळ कंपनी One 97 Communications च्या स्टॉकच्या भविष्याबाबत ब्रोकरेज हाऊसचे मत जाणून घ्यायचे आहे. पण या स्टॉकबाबत ब्रोकरेज हाऊसेसचे मतही पूर्णपणे वेगवेगळे असल्याचे दिसते. जाणून घेऊया या स्टॉकबाबत ब्रोकरेज हाऊसचा अंदाज काय आहे…

 

हा आहे Macuarie चा अंदाज
पेटीएमच्या स्टॉकची सर्वाधिक चर्चा मॅक्युअरीच्या अंदाजाबाबत आहे. या स्टॉकबाबत या ब्रोकरेज हाऊसचे अंदाज अनेक वेळा बरोबर सिद्ध झाले आहेत. ब्रोकरेजने या स्टॉकसाठी 450 रुपयांचे टार्गेट कायम ठेवले आहे.

 

Goldman Sachs आणि इतर ब्रोकरेजचा अंदाज
मॅक्युअरीच्या अंदाजाच्या विरोधात, गोल्डमन सॅच आणि आयसी ICICI Securities ने या स्टॉकसाठी 1,000-1,300 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. याचे कारण Ebitda Loss शी संबंधित त्यांच्या अपेक्षा Macuarie च्या अपेक्षा वेगळ्या आहेत.

 

कंपनीचे चौथ्या तिमाहीचा निकाल
पेटीएमचे संचालन करणार्‍या वन 97 कम्युनिकेशन्सने म्हटले आहे की मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा 761.4 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या वर्षी मार्च तिमाहीत कंपनीला 441.8 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीला सुमारे 778 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. (Paytm)

कंपनीच्या महसुलात मोठी वाढ
ऑपरेशन्समधील कमाई 88.99 टक्क्यांनी वाढून 1,540.90 कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 815.30 कोटी रुपये कमावले होते.

 

अंदाजापेक्षा जास्त महसूल वाढ
मार्च तिमाहीत पेटीएमच्या महसुलात 89 टक्के वाढ झाली आहे. हे गोल्डमन सॅच्सच्या अंदाजापेक्षा चार टक्के अधिक होते.
गेल्या दोन तिमाहींच्या तुलनेत, नॉन-यूपीआय व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे, जी आधी कमी होण्याची अपेक्षा होती.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केटममधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Paytm | paytm stock to fall up to rs 450 or jump till rs 1300 know the experts take on it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Minor Girl Rape Case | धक्कादायक ! नात्यातील 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फिरायला नेऊन मारली ‘मज्जा’ ! 8 महिन्यांची गरोदर राहिल्याने धक्कादायक प्रकार उघडकीस

 

Paytm द्वारे या पध्दतीनं मोबाईल केला रिचार्ज तर मिळू शकतो 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या पद्धत

 

Edible Oils Price Down | सर्वसामान्यांना दिलासा ! मोहरीचे कच्ची घानी तेल 40 रुपयांनी स्वस्त; सोयाबीन-शेंगदाणा तेलाचे भावही उतरले