Paytm आणतेय देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा IPO, गुंतवणूकदारांना मोठी संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात डिजिटल व्यवहारांमध्ये आघाडीवर असलेली Paytm कंपनी देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा IPO आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. Paytm च्या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मोठी सुवर्ण संधी प्राप्त होईल, असे सांगितले जात आहे. Paytm कडून यंदाच्या नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या दरम्यान देशातील सर्वांत मोठा आयपीओ आणला जाणार आहे. एका वृत्तानुसार पेटीएमने आयपीओतून प्राथमिक बाजारातून 3 बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 22 हजार कोटी जमा करण्याचे लक्ष्य ठेवल्याचे समजते.

B.G. कोळसे-पाटलांचा सवाल; म्हणाले – ‘त्यावेळी संभाजी छत्रपतींनी संसदेत तोंड का उघडले नाही ?’

Paytm ची मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्सचे संचालक मंडळ IPO ला मान्यता देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आयपीओद्वारे पेटीएमने आपले मूल्यांकन 25 ते 30 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1.80 लाख कोटीवरून वाढवून 2.20 लाख कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. या IPO मध्ये नवीन शेअर्ससोबत कंपनी प्रवर्तक आणि विद्यमान गुंतवणूकदाराद्वारे शेअर विक्रीसाठी ऑफर देतील जेणेकरुन काही कंपन्यांना यातून बाहेर पडता येणार आहे. Paytm च्या IPO साठी निवडलेल्या बँकांमध्ये मॉर्गन स्टेनली, सिटी ग्रुप, जेपी मॉर्गन यासारख्या गुंतवणूकदारांचा समावेश आहे. मॉर्गन स्टेनली लीड मॅनेजर बनण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे असल्याचे सांगितले जात आहे. या आयपीओसाठी प्रक्रिया जून किंवा जुलैमध्ये सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सेबीच्या नियमांनुसार IPO ओ आणणाऱ्या कंपनीला पहिल्या 2 वर्षात 10 टक्के तर पुढील 5 वर्षात 25 टक्क्यापर्यंत हिस्सा सामान्यांसाठी खुला करावा लागतो. म्हणजेच कंपनी जास्तीत जास्त 75 टक्के हिस्सा स्वतः जवळ ठेऊ शकते.

Also Read This : 

दलित समाजाबद्दल जातीवाचक वक्तव्य; ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीवर FIR

Video : पुण्यात नाकाबंदीमध्ये ट्रॅफिक पोलिसानं दुचाकी थांबवली ! दुचाकीस्वारानं फरफटत नेल्यानं पोलिस हवालदार जखमी; व्हिडीओ CCTV मध्ये कैद

राज्यातील ‘या’ 21 जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त; 15 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ वाढणार