सणासुदीमध्ये पैशांची असेल कमतरता तर Paytm Postpaid ने करा शॉपिंग, एक महीन्यानंतर करा पेमेंट, जाणून घ्या

नवी दिल्ली : देशात सध्या फेस्टिव्ह सीझन सुरू आहे. या सीझनमध्ये नेहमी लोकांना पैशांची कमतरता जाणवतेच. अशावेळी काहीजण आपले कुटुंबिय किंवा मित्रांकडून पैसे उधार घेतात. परंतु, यांच्याशिवाय सुद्धा मार्केटमध्ये अनेक ऑपशन आहेत. सध्या देशात अनेक कंपन्या बाय नाऊ पे लेटरची सुविधा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी पेटीएम सुद्धा बाय नाऊ पे लेटरची सुविधा देत आहे. कंपनीने या सर्व्हिसचे नाव पेटीएम पोस्टपेड ठेवले आहे. पेटीएम पोस्टपेड आपल्या यूजर्सला 1 लाख रूपयांपर्यंतचे क्रेडित लिमिट देते. यूजर्स क्रेडिट लिमिटमध्ये खर्च करू शकतात आणि पैसे पुढील महिन्यात भरू शकतात.

छोट्या दुकानदारांना करू शकता पेमेंट
पेटीएम पोस्टपेड सर्व्हिसचा वापर तुम्ही पेटीएम अ‍ॅपवर रिचार्ज, बिल पेमेंट किंवा शॉपिंग इत्यादीमध्ये करू शकता. विशेष गोष्ट ही आहे की, पेटीएम पोस्टपेड यूजर्स आपल्या जवळपासच्या किराणा स्टोअर्सवर सुद्धा याद्वारे खरेदी करू शकता.

पेटीएम पोस्टपेडचे तीन वेरियंट
कंपनीने पेटीएम पोस्टपेडचे तीन वेरियंट्स सादर केले आहेत. हे तीन वेरियंट-Lite, Delite आणि Elite आहेत. पोस्टपेड लाइटमध्ये 20,000 रुपयांपर्यंतची सीमा आहे, ज्यासोबत कन्व्हीनियन्स फि मासिक बिलात जोडली जाईल. पोस्टपेड डिलाइट आणि पोस्टपेड एलीट 20,000 रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंत मासिक क्रेडिट लिमिटसह येत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची कन्व्हीनियंस फि नाही.

पेटीएम पोस्टपेड कसे कराल अ‍ॅक्टिव्हेट
कंपनी हळुहळु पेटीएम पोस्टपेड सर्व्हिसचा विस्तार आपल्या ग्राहकांमध्ये करत आहे. जर तुम्ही एलिजिबल आहात तर खाली दिलेली प्रोसेस फॉलो करून पेटीएम पोस्टपेड सर्व्हिसला एक्टिव्हेट करू शकता.

पेटीएम अकाऊंटमध्ये लॉग इन करा आणि सर्च आयकॉनवर My Paytm Postpaid टाइप करा.
यानंतर Paytm Postpaid आयकॉनवर क्लिक करा.
यानंतर केवायसी पूर्ण करा. केवायसीची पूर्ण प्रक्रिया डिजिटल आहे.
केवायसीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची पेटीएम पोस्टपेड सर्व्हिस अ‍ॅक्टिव्हेट होईल.