Paytm युजर्सना झटका ! आता क्रेडिट कार्डद्वारे वॉलेटमध्ये पैसे जोडणे झाले आणखी महाग, जाणून घ्या किती लागणार अतिरिक्त शुल्क

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिजिटल पेमेंट प्रदाता कंपनी पेटीएम ऑनलाईन व्यवहारासाठी बहुतेक ग्राहकांची पहिली पसंती आहे. ग्रोसरी स्टोरमधून सामान खरेदीसाठी,पाणी आणि लाईट बिल, गॅस सिलिंडर बुकिंग, मोबाईल आणि डीटीएच रिचार्जसाठी किंवा ऑनलाईन ऑर्डरसाठी पेटीएम मोबाईल वॉलेटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे देशातील सर्वात मोठे पेमेंट ऑप्शन म्ह्णून पेटीएम उदयास आले आहे. लोक क्रेडिट कार्डवरून पेटीएम वॉलेटमध्ये पैसे जोडून व्यवहार करतात. मात्र आता पेटीएमचा वापर करणे महाग पडणार आहे.

2.07 ते 4.07 टक्के अतिरिक्त शुल्क
paytmbank.com/ratesCharges वर दिलेल्या माहितीनुसार, जर कोणताही युजर पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डवरून पैसे अ‍ॅड करत असेल तर त्याला 2.5 टक्के अतिरिक्त शुल्क द्यावा लागेल. हा नियम जानेवारी 2021 पासून लागू होईल. अमेरिकन एक्सप्रेसच्या क्रेडिट कार्डने पैसे अ‍ॅड केल्यावर 3 टक्के अतिरिक्त शुल्क द्यावा लागेल. महत्वाचे म्हणजे अनेक वापरकर्त्त्यांची तक्रार आहे कि, पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने पैसे अ‍ॅड केल्यावर 2.07 टक्के अतिरिक्त शुल्क लागत आहे. तर अनेक युजर्सचे म्हणजे आहे कि, त्यांना 4.07 टक्के अतिरिक्त शुल्क लागत आहे.

15 ऑक्टोबरपासून आकारला जात होता 2% अतिरिक्त शुल्क
यापूर्वी 15 ऑक्टोबर 2020 रोजी जर एखादी व्यक्ती क्रेडिट कार्डसह पेटीएम वॉलेटमध्ये पैसे अ‍ॅड करत असेल तर त्याला 2 टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागत होते. म्हणजेच, जर आपण क्रेडिट कार्डसह पेटीएम वॉलेटमध्ये 100 रुपये जोडत असाल तर आपल्याला आपल्या क्रेडिट कार्डसह 102 रुपये भरणे आवश्यक होते.

व्यापारी साइटवर पेमेंट केल्यावर नाही द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क
दरम्यान, पेटीएम कडून कोणत्याही व्यापारी साइटवर पैसे भरण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. पेटीएम वरून पेटीएम वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरित करताना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्याच वेळी, आपण पेटीएम वॉलेटमध्ये डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगसह पैसे जोडले तरी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यापूर्वी 1 जानेवारी 2020 ला देखील नियमात बदल करण्यात आला होता. महिन्यात क्रेडिट कार्डने 10 हजार रुपयांपेक्षा जात पैसे जोडल्यास कंपनी 2 टक्के चार्ज घेत होती.