Paytm वॉलेटमध्ये पैसे अ‍ॅड करणं ‘महागलं’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पेटीएम युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. पेटीएम युजर्सला आता अतिरीक्त शुल्काचा भार सोसावा लागणार आहे. पेटीएमने लाखो ग्राहकांना झटका दिला आहे. क्रेडिट कार्डने पेटीएम वॉलेटमध्ये 10,000 किंवा त्याहून अधिक रक्कम जमा केल्यास त्यावर किमान 2 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. पेटीएमने याबाबत माहिती दिली आहे. पेटीएमचे एकूण 35 कोटींहून अधिक ग्राहक आहेत.

पेटीएमने ट्विटरवर ट्विट करत म्हटले आहे की, “यापुढे ग्राहकाने महिन्याभरात क्रेडिट कार्डने पेटीएम वॉलेटमध्ये 10,000 किंवा त्यातून अधिक रक्कम अ‍ॅड केली तर त्यांना 2 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. म्हणजेच जर तुम्ही पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने 10,000 रुपये अ‍ॅड केले तर किमान 200 रुपये अतिरीक्त शुल्क तुम्हाला आकारले जाईल.

गेल्या वर्षभरापासून कंपनीचा शुल्क आकारण्याबाबत विचार सुरू होता. अखेर नव्या वर्षापासून तो लागू करण्यात आला आहे. आता 10,000 किंवा त्याहून अधिक रक्कम पेटीएमला अ‍ॅड करताना ग्राहकांना अतिरीक्त भार सोसावा लागेल. डेबिट कार्ड आणि युनिफाईड पेमेंट इंटरफेसमधून पेटीएम वॉलेटमध्ये टॉपअप करणे नि:शुल्क आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/