Coronavirus : PayTm कंपनीने केली मोठी घोषणा, म्हणाले – ‘भारताला 3 हजार ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर देणार’

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, इंजेक्शन, बेडचा तुटवडा जाणवत आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. या दरम्यान, भारताला मदत करण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अशातच आर्थिक सेवा देणारी कंपनी पेटीएमने सोमवारी (दि. 26) एक मोठी घोषणा केली आहे. पेटीएम फाउंडेशन 3 हजार ऑक्सिजन कन्सट्रेटर आयात करणार आहे. यामुळे देशातील ऑक्सिजनची कमी दूर करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

PayTm कंपनीने भारतासाठी ऑक्सिजन फॉर इंडिया नावाने एक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतून जनजागृतीचे काम केले जाणार आहे. पेटीएमने म्हटले की, PayTm फाउंडेशनने 1 हजार ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरच्या आयातीसाठी ऑर्डर दिल्या आहेत. याची बाजारात 4 कोटी किंमत आहे. कंपनीने लोकांकडून 10 कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पेटीएम फाउंडेशने 3 हजार ऑक्सिजन कन्सट्रेटर आयात करण्याची योजना बनवली आहे. यांतून हॉस्पिटल क्लिनिक आणि रेजिडेंट वेलफेयर असोसिएशनला दिले जाणार आहे. पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शंकर शर्मा यांनी म्हटले आहे की, मी अन्य स्टार्टअप कंपन्यांना आवाहन करतो की, त्यांनी या मोहिमेत सहभाग घेऊन मदत करावी. आमच्या एक रुपयांच्या मदतीत त्यांनी एक रुपया मिळवावा म्हणजेच ऑक्सिजन कन्सट्रेटरची संख्या दुप्पट होईल असे ते म्हणाले.

दरम्यान वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोमवारी ट्विट करून भारताला 135 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच मायक्रोसॉफ्टचे सीईओने सुद्धा ट्विट करून भारताला मदतीची घोषणा केली आहे .त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारताची स्थिती पाहून मी खूप दुःखी आहे. अमेरिका सरकार मदतीसाठी पुढे आल्याने त्यांचे आभार मानतो. मायक्रोसॉफ्ट कंपनी भारताला ऑक्सिजन कन्सन्ट्रेशन डिव्हाइस खरेदी करण्यासाठी मदत करणार आहे.