PBG Kolhapur Tuskers | ‘कोल्हापूर टस्कर्स’च्या कर्णधारपदी राहुल त्रिपाठी; संघमालक पुनीत बालन यांची घोषणा

केदार जाधव यांच्या निवृत्तीमुळे घेतला निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PBG Kolhapur Tuskers | टीम इंडियात एकेकाळी महाराष्ट्राचा झेडा डौलाने फडकवत ठेवणारा आणि सध्या सुरु असलेल्या ‘एमपीएल’मधील कोल्हापूर टस्कर्स संघाचा कर्णधार केदार जाधव (Kedar Jadhav) याने अचानक सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करुन राज्यातील तमाम क्रिकेट रसिकांना धक्का दिला. त्यांच्या या निर्णयामुळे ‘कोल्हापूर टस्कर्स’चे मालक युवा उद्योजक पुनीत बालन (Young Entrepreneur Punit Balan) यांनी राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याची कर्णधारपदी निवड करून त्याच्यावर मोठा विश्वास टाकला.

राज्यात कालपासून (दि. २ जून) ‘एमपीएल’चा दुसरा हंगाम सुरु झाला असून सलामीच्या सामना कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स यांच्यात झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (दि. ३ जून) केदार जाधव यांनी अचानक सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गेल्या वर्षीच्या पहिल्या हंगामातही केदार जाधव यांनीच कोल्हापूर टस्कर्सच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. परंतु त्यांच्या निवृत्तीमुळे संघमालक पुनीत बालन यांनी राहुल त्रिपाठी याची कर्णधार म्हणून घोषणा केली. आता राहुल त्रिपाठी आणि उपकर्णधार श्रीकांत मुंडे ही जोडगोळी कोल्हापूर टस्कर्सला कोणत्या दिशेने घेऊन जातेय याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.

केदार जाधव यांनी खेळाडू म्हणून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी अलीकडच्या काळात त्यांनी मराठीमध्ये क्रिकेट समालोचक म्हणून काम करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे क्रिकेट समालोचक म्हणून त्यांची क्रिकेटच्या मैदानातील नाळ कायम राहते की नाही, हे येणाऱ्या काळात लवकरच दिसेल.

‘‘अत्यंत अनुभवी खेळाडू असलेले केदार जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्याची संधी मिळताच दुसऱ्याच दिवशी त्यांनी निवृत्ती घोषित करणं, हा माझ्यासाठीही एक धक्का आहे. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेमलेले असल्याने त्यांच्या अनुभवाचा आम्हा सर्वांनाच मोठा फायदा होत होता. परंतु त्यांच्या निर्णयाने संघ मालक पुनीत बालन सर यांनी संघाचीच जबाबदारी माझ्यावर टाकली. संघातील सर्व खेळाडूंना सोबत घेऊन त्यांचा हा विश्वास सार्थ करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल.’’

राहुल त्रिपाठी (कर्णधार, कोल्हापूर टस्कर्स)

‘कोल्हापूर टस्कर्स’ संघासाठी आजचा दिवस कठीण आणि वेगळा आहे.
केदार जाधव यांची निवृत्ती ही आम्हा सर्वांसाठीच आश्चर्यकारक होती.
ते केवळ एक खेळाडूच नाही तर माझे चांगले मित्र आहेत. आज त्यांनी खेळातून निवृत्तीची घोषणा केली
असली तरी क्रिकेटच्या मैदानाशी आणि क्रिकेटशी त्यांचं नातं कायम राहील, असा विश्वास वाटतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!

पुनीत बालन (युवा उद्योजक व संघमालक, कोल्हापूर टस्कर्स)
Punit Balan (Young Entrepreneur and Team Owner, Kolhapur Tuskers)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | लोकसभेच्या निकालापूर्वीच महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, भाजपचा माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला

Pune Municipal Corporation (PMC) | महापालिकेचा अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर; विकासकामांच्या फायली गहाळ झाल्या की केल्या?

Kalyaninagar Porsche Car Accident Pune | ‘त्या’ला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा; बाल न्याय मंडळाचा आदेश