PCMC Action On Unauthorized Construction | पिंपरी चिंचवड महापालिकेची अनधिकृत बांधकामावर कारवाई (Video)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – PCMC Action On Unauthorized Construction | क क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र.२ बो-हाडेवाडी येथील गट क्र.२३३ व २३४ इंद्रायणी नदीपात्रातील निळ्या पूररेषेतील सुमारे १८ हजार चौरस फूटाची अनधिकृत बांधकामे निष्कासनाची कारवाई आज करण्यात आली.(PCMC Action On Unauthorized Construction)

दोन पोकलेन आणि तीन जेसीबी यांच्या सहाय्याने केलेल्या कारवाईत नऊ दोन मजली बांधकामे,दोन तळमजल्यापर्यतची बांधकामे, दोन जोत्यापर्यतची बांधकामे अशी एकुण १२ हजार चौरस फूटाची आर.सी.सी. बांधकामे आणि चार पत्राशेडची एकूण ६ हजार चौरस फुट अशा १८ हजार चौरस फूटांचे अतिक्रमण निष्कासीत करण्यात आले.

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील तसेच शहर
अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या आजच्या अतिक्रमण कारवाईत उपायुक्त मनोज लोणकर,
आण्णा बोदडे, उप अभियंता सूर्यकांत मोहिते,कनिष्ठ अभियंता संदीप वैद्य,किरण सगर, बीट निरीक्षक श्रीकांत फाळके
त्याचप्रमाणे भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे गणेश जामदार, किरण पठारे, ३० पोलीस कर्मचारी,
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे २२ सुरक्षा रक्षक,अतिक्रमण आणि अग्निशामक पथकाचे जवान,
वैद्यकीय विभागातील रूग्णवाहिकेचा समावेश होता.

शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई यापुढेही चालू राहणार असून शहरातील नागरिकांनी रितसर परवानगी
घेऊनच बांधकामे करावीत, अनधिकृत बांधकामे करू नयेत असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Kalyani Nagar Pune Accident | ‘कुणालाही पाठीशी घालू नका’ पुणे हिट अँड रन प्रकरणात CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश

Pune CP Amitesh Kumar On Kalyani Nagar Accident | व्हायरल व्हिडिओवर पोलीस आयुक्त म्हणाले, आरोपीने ऑनलाईन पेमेंट केले यातून मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट, पण… (Video)

Kalyani Nagar Pune Accident | पुणे हिट अँड रन प्रकरण : अपघात प्रकरणाचा आणखी एक व्हिडीओ आला समोर, काय आहे व्हिडीओत? (Video)

Shrirang Barne On Ajit Pawar NCP | श्रीरंग बारणेंची नाराजी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, माझे काम केले नाही, अजितदादांना यादी… (Video)