PCMC Addl Commissioner | राजकीय दबावामुळे स्मिता झगडे यांचा बळी; नियुक्ती रद्द, अतिरिक्त आयुक्तपदावर प्रदीप जांभळे यांची वर्णी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्तपदावर (PCMC Addl Commissioner) रूजू होण्याआधीच स्मिता झगडे (Smita Zagde) यांची बदली राज्य शासनाकडून (State Government) अचानक रद्द (Appointment Canceled) करण्यात आली आहे. तर, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर (PCMC Addl Commissioner) वसई-विरार महापालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे पाटील (Pradeep Jambhale Patil) यांची वर्णी लागली आहे.

 

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Cover Development) यांची 13 सप्टेंबर 2022 रोजी बदली करून त्यांच्या जागी महापालिकेतील उपायुक्त स्मिता झगडे यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली होती. दहा दिवस त्यांना आयुक्त शेखर सिंह (Commissioner Shekhar Singh) यांनी रूजू करून घेतले नाही. त्यानंतर आज अचानक राज्य शासनाने त्यांची नियुक्ती रद्द करून पुन्हा उपायुक्त या मूळ पदावर काम करण्याचे आदेश दिले. तर, अतिरिक्त आयुक्तपदावर वसई-विरार महापालिकेचे उपायुक्त (Vasai-Virar Municipal Corporation Deputy Commissioner) प्रदीप जांभळे पाटील यांची नियुक्ती केली आहे. हे सर्व आदेश राज्याच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले (Deputy Secretary Priyanka Kulkarni-Chapwale) यांनी काढले आहे. (PCMC Addl Commissioner)

या सर्व प्रकारात राजकीय दबाव आणि राज्य शासनाच्या गोंधळामध्ये एका महिला अधिकाऱ्याचा बळी दिल्याची
चर्चा पिंपरी चिंचवड महापालिका वर्तुळात होत आहे.
यासोबत झगडे यांची नियुक्ती शिंदे गटामार्फत झाली होती. परंतु, त्यांच्या नियुक्तीला भाजपने विरोध केल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपमध्ये (BJP) अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Web Title :- PCMC Addl Commissioner | Appointment of Smita Zagde canceled due to political pressure, Pradeep Jambhale appointed as Additional Commissioner

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Narayan Rane On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्यामागे ईडी लागणार; नारायण राणे यांनी थेट दिला इशारा, आत जाल…

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आपल्या परिवाराशिवाय कोणीच दिसत नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

IND vs AUS | भारत-ऑस्ट्रेलिया मॅचच्या तिकीट खरेदीसाठी रांग ! चाहत्यांवर लाठीचार्ज