मुलगी होण्याच्या भीतीने पत्नीच्या गर्भावर पतीची लाथा बुक्क्यांनी मारहाण

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन
पिंपरी-चिंचवड मधील वाकड येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून गर्भात मुलगी असल्याच्या भीतीने पतीने पत्नीच्या गर्भावर लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याने समोर आले आहे. या घटनेत पत्नीचा गर्भपात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही धक्कादायक घटना २०१७ मध्ये घडली असून गेल्या आठवड्यात पीडित महिला मनोरुग्ण झाली आहे. या घटने प्रकरणी त्याचे सासरे मोहन सिधाराम जावीर यांनी वाकड पोलिसात तक्रार दिली आहे. नराधम पती प्रकाश विठ्ठल केंगार याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. परंतु या घटनेत पीडित पत्नी मनोरुग्ण झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चार वर्षांपूर्वी पीडित महिलेचा आणि आरोपी प्रकाश विठ्ठल केंगार यांचा विवाह झाला होता.त्यानंतर काही वर्षांनी मुलगी झाली होती. परंतु त्या मुलीच्या पालन पोषणासाठी आरोपी प्रकाश हा सासरच्या मंडळींकडे पैश्याची मागणी करत होता. तसेच वेळोवेळी पत्नीचा मानसिक छळ करत होता त्याचबरोबर मारहाण देखील करायचा. दुसऱ्यांदा पीडित महिला ही गर्भवती राहिली होती, मात्र तिला पुन्हा मुलगी होणार या संशयावरून तो तिला नेहमी मारहाण करत असे,पीडित महिला ही साडेतीन महिन्याची गर्भवती असताना दोघात मुलगी होणार की मुलगा यावरून भांडण झाले आणि आरोपी पती प्रकाश याने तिच्या गर्भावर लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली, यातच पत्नीचा गर्भपात झाला या घटनेचा पीडित महिलेवर जबरदस्त परिणाम झाल्याने महिला मनोरुग्ण झाली आहे. आरोपी प्रकाश केंगार हा एका बँकेचे कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता.या प्रकरणी प्रकाश केंगारला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.