
PCMC Job | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत लेखी परीक्षेशिवाय नोकरीची संधी,80 हजारापर्यंत पगार; जाणून घ्या सवीस्तर
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – PCMC Job | नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरीची संधी निर्माण झाली आहे. उमेदवारांना चांगला पगार मिळणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (PCMC Job) यासंदर्भात नोटिफिकेशन (Notification) जाहीर केले असून पदसाठी लागणारी पात्रता, रिक्त जागा, पगार, मुलाखतीचा पत्ता याची सविस्तर माहिती दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC Job) नोटिफिकेशननुसार पालिकेमध्ये सिनीअर रेसिडेंशियल पदाच्या (Senior Resident post) एकूण 59 रिक्त जागांवर भरती (Recruitment) केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त शिक्षणसंस्था किंवा विद्यापीठातून एमबीबीएस (MBBS) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
याशिवाय उमेदवारांकडे संबंधित विषयातील डिग्री/एमडी/ DNB मान्यताप्राप्त डिप्लोमा केलेला असावा. तसेच उमेदवाराकडे एम.एम.सी. कडे रजिस्ट्रेशन अपडेट असणे गरजेचे आहे.
सिनीअर रेसिडेंशियल पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 80 हजार 250 रुपयापर्यंत वेतन दिले जाणार आहे. तसेच उमेदवारांना पिंपरी-चिंचवड, पुणे येथे नोकरी मिळणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणते शुल्क आकारले जाणार नाही.
सिनीअर रेसिडेंशियल पदासाठी कोणती ही परीक्षा घेतली जाणार (Jobs Without Exam) नाही. थेट पद्धतीने ही निवड केली जाणार आहे. 27 आणि 28 जुलै 2023 रोजी ही मुलाखत होणार आहे. ज्या उमेदवारांनी सिनीअर रेसिडेंशियल पदासाठी अर्ज केला आहे, त्या उमेदवारांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India), पुणे विमानतळ (Pune Airport), पुणे (जुना कॉन्फरन्स हॉल) येथे उपस्थित राहायचे आहे.
मुंबई पालिकेत नोकरीची संधी
मुंबई महानगरपालकेमध्ये (Brihanmumbai Municipal Corporation) विविध पदांची भरती केली जाणर आहे. यासाठी दहावी ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन जाहीर केले असून यामध्ये पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, पगार याची माहिती देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पदभरती (BMC Job) अंतर्गत 8
रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये ज्युनिअर लाइब्रेरियन
(Junior Librarian) -1, ज्युनिअर डायटेशियन (Junior Dietician) -3,
ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist-) 1 आणि ऑडिओलॉजिस्ट (Audiologist)
3 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवाराला 25 हजारापर्यंत पगार दिला जाणार आहे.
उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवारांनी आपले अर्ज खोली क्र.15, तळ मजला, रोख विभाग,
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय,
कॉलेज बिल्डिंग येथे पाठवायाचा आहे.
अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 14 ऑगस्ट 2023 आहे.
मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Janhvi Kapoor | जान्हवीने तिच्या सहकलाकाराला लगावली कानशिलात;
नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त