MNS : मनसेचा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या

पिंपरी-चिंचवड : पोलिसनामा ऑनलाईन
शहरातून जाणाऱ्या पवना,मुळा,मुठा या नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी साठली असून आता ती काढण्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महानगर पालिकेतील आरोग्य अधिकारी यांच्या कार्यलयासमोर ठिय्या मांडत नदीची समस्या मांडली आहे. ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी मनसे कडून करण्यात आली आहे.

शहरातून पवना, मुळा, मुठा या महत्वाच्या नद्या वाहतात परंतु या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली असून यामुळे डास वाढल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.परंतु ज्या ठेकेदाराना याचे कंत्राट दिले आहे ते केवळ पावसाळा येण्याच्या एक महिना अगोदर तत्परता दाखवतात. यामुळे जलपर्णीचा नायनाट होत नाही.अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी मसने शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे, ते सेवा ठेकेदार आणि आरोग्य अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप देखील केला आहे. यावेळी नदी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, संबंधित ठेकेदारांवर कारवाई करा,अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आरोग्य अधिकारी मनोज लोणकर यांना मनसे कडून निवेदन देण्यात आले.

यावेळी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, रुपेश पटेकर, राजु सावळे, मयुर चिंचवडे, संजय यादव, स्नेहल बांगर, अश्विनी बांगर, अक्षय नाळे, शांतीलाल दहिफळे, शाम जगताप, नारायण पठारे, संतोष यादव, विकास कदम, सुशांत साळवी, सुरेश सकट, विजय क्षीरसागर, रोहित काळभोर हे कार्यकर्ते उपस्थित होते.