पीएमपीएमएलतर्फे थेरगाव येथील ’16 नंबर’ बस स्टॉप येथे पास केंद्र सुरु

थेरगाव : पोलीसनामा ऑनलाइन
ज्येष्ठ नागरिक,विध्यार्थी,अंध व अपंग व नागरिकांच्या मागणीनुसार स्थायी समितीच्या सभापती ममताताई विनायक गायकवाड व माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे पीएमपीएमएलतर्फे 16 नंबर बस स्टॉप येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पास केंद्र सुरु करण्यात आले.

थेरगाव येथील १६ नंबर बस स्टॉप केंद्राचे उद्‌घाटन स्थायी समिती सभापती ममताताई विनायक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगरसेविका अर्चना तानाजी बारणे, मनिषा पवार, नगरसेवक कैलास बारणे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड व पीएमपीएमएलचे अधिकारी उपस्थित होते.

वाकड,थेरगाव,डांगेचौक परिसरातील नागरिकांची, ज्येष्ठ नागरिक, अंध-अपंग तसेच विध्यार्थी यांची या परिसरात पास केंद्र नसल्यामुळे गैरसोय होत होती. या परिसरात पास केंद्र व्हावे अशी मागणी नागरिकांकडून वारंवार होत होती. मागणीची दखल घेऊन स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांनी १६ नंबर बस स्टॉपवर पास केंद्र सुरु केले. तसेच वाकड चौक येथे देखील पास केंद्र चालू करणार आहे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या परिसरातील बऱ्याच नागरिकांचा त्रास कमी होऊन सुविधा लवकरात लवकर मिळण्यास मदत होत आहे .