PCMC Property Tax Collection | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत 625 कोटींचा मिळकत कर जमा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहराची वाढ होत आहे. महापालिकेच्या कर आकारणी (PCMC Property Tax Collection) व कर संकलन विभागाने (PCMC Tax Collection Department) केलेल्या प्रयत्नांमुळे 2021 – 22 या आर्थिक वर्षात महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 625 कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला आहे. ही आजपर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 मार्च रोजी 50 कोटी रुपयांचा कर वसुल (PCMC Property Tax Collection) झाला आहे. सरत्या आर्थिक वर्षामध्ये (Financial Year) थेरगाव विभागात (Thergaon Division) सर्वाधिक 136 कोटी तर सर्वात कमी पिंपरी वाघेरे (Pimpri Waghere) कार्यालयाने 6 कोटी रुपये कर वसुली केली आहे. मागील वर्षाची आकडेवारी पाहता यंदाच्यावर्षी 68 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये शहरातील 5 लाख 69 हजार 514 मालमत्तांची नोंद आहे. 16 विभागीय कार्यालयाच्या (Divisional Office) माध्यमातून कर वसुली (PCMC Property Tax Collection) केली जाते. 2021 – 22 या आर्थिक वर्षात 850 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. कर आकारणी विभागाने कर वसुली करण्यासाठी थकबाकीदारांना नोटीस (Notice) बजावल्या होत्या. नोटीस देऊन देखील ज्यांनी कर भरणा केला नाही अशा मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. महापालिकेने कर न भरणाऱ्या 276 थकबाकीदारांच्या मालमत्ता सील (Property Seal) केल्या आहेत. 31 मार्च 2022 अखेर 3 लाख 24 हजार 572 मालमत्ताधारकांनी 625 कोटी रुपयांचा कर जमा केला आहे.

मध्यंतरीच्या काळात लॉकडाऊन (Lockdown) असल्याने अनेक मिळकतधारकांनी ऑनलाईन पेमेंट (Online Payment) द्वारे मिळकत कर भरला आहे. 2 लाख 322 मिळकतधारकांनी घरबसल्या आपला मिळकत कर पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. तर धनादेशाद्वारे (Check) 25 हजार 6 मिळकतधारकांनी 133.9 कोटी रुपयांचा कर जमा केला. तर डिमांड ड्राफ्टच्या (Demand Draft) माध्यमातून 887 मिळकतधारकांनी 50.95 कोटी रुपयांचा भरणा केला आहे.

 

रोखीने कर जमा करणाऱ्यांची संख्या 80 हजार 548 एवढी असून त्यांनी 85.53 कोटी रुपये भरले आहेत. निफ्टी द्वारे (Nifty) 291 मालमत्ताधारकांनी 19.5 कोटी, आरटीजीएस द्वारे (RTGS) 166 मालमत्ताधारकांनी 30.84 कोटी तर पॉस मशिनच्या (POS Machine) माध्यमातून 1849 मिळकतधारकांनी 2.34 कोटींचा भरणा केला आहे. शास्ती समयोजनेतून 12.57 कोटींचा भरणा झाला आहे.

 

Web Title :- PCMC Property Tax Collection | 625 crore property tax collected in Pimpri Chinchwad Municipal Corporation PCMC

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा