PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महापालिकेत मेगा भरती ! 4292 पदांची होणार भरती; जाणून घ्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महापालिकेत (Pimpri-Chinchwad Corporation) मेगा भरती होणार आहे. महापालिकेच्या ‘ब’ वर्गात (‘B’ Category) समावेश झाला आहे. महापालिकेचा नव्याने आकृतिबंध तयार करण्यात आला असून राज्य सरकारने (Maharashtra Government) अस्थापनेवरील सरळ सेवेने (Direct Service) वेगवेगळी पदं भरण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारने महापालिका अस्थापनेवरील (Establishments) पदे भरण्यास परवानगी दिल्याने 4292 पदांची भरती (PCMC Recruitment 2022) केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया महापालिका स्वत: राबविणार आहे.

 

पालिका आस्तापनेवरील नोकरभरती करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. 14 डिसेंबरला महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासकीय खर्च 35 टक्के मर्यादेच्या आत राहील याची आयुक्तांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना नगरविकास विभागाने महापालिकेला दिली आहे. त्यामुळे महापालिका लवकरच नोकर भरती (PCMC Recruitment 2022) करणार आहे. त्या दृष्टीने प्रशासन विभागाने तयारी सुरु केली आहे.

 

खासगी संस्थेच्या माध्यमातून भरती करत असताना अनेक गैरप्रकार घडत आहेत.
यामुळे महापालिकेने ही भरती प्रक्रिया स्वत: राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका प्रशासनाचे उपायुक्त सुभाष इंगळे (Deputy Commissioner Subhash Ingle) यांनी दिली.
महापालिकेकडून वैद्यकीय (Medical), आरोग्य (Health), विद्युत (Electricity), पाणीपुरवठा (Water Supply) या अत्यावश्यक विभागातील पदांची भरती केली जाणार आहे.
यामध्ये लिपिक (Clerks), प्रशासन अधिकारी (Administration Officers), अभियंता (Engineers) आणि अन्य आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

 

Web Title :-  PCMC Recruitment 2022 | PCMC recruitment of 4292 posts in pimpri chinchwad municipal corporation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in India | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची मध्यावस्था; फेब्रुवारीत कळस गाठण्याची शक्यता

 

Girish Mahajan | गिरीश महाजन यांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले – ‘एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतात’

 

Post Office Schemes | हवा असेल वर्षाला चांगला रिटर्न तर पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, मिळतात अनेक फायदे

 

Multibagger Penny Stock | ‘या’ स्टॉकने एक वर्षात 1 लाखाचे केले 83 लाख, शेयरमध्ये अजूनही तेजीत !