पीसीएमटीचे माजी सभापती सुरेश चोंधे यांचे निधन 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन
पिंपरी चिंचवड महापालिका परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष (पीसीएमटी) आणि भाजपाचे विद्यमान नगरसेवक आरती चोंधे यांचे पती सुरेश चोंधे पाटील (वय 53) यांचे आज (रविवारी) दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरेश चोंधे आजारी होते. बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्यावर आज (रविवार ) रात्री 8 वाजता, पिंपळे निलख येथील  विशालनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजकीय कारकीर्द सुरु केलेले सुरेश चोंधे पीसीएमटीचे सभापती राहिलेले आहेत. यानंतर त्यांनी कॉंग्रेसचा हात धरत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.  यांनतर त्यांची पत्नी आरती चोंधे कॉंग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आल्या. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत आरती चोंधे भाजपात गेल्या आणि दुसऱ्यांदा नगरसेवक झाल्या.