PDCC Bank Election | पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवार यांची पहिल्यांदाच बिनविरोध निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PDCC Bank Election | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत (PDCC Bank Election) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बिनविरोध निवड झाली आहे. ‘अ’ वर्ग मतदारसंघातून बारामतीतून अर्ज दाखल केलेले शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे (Satish Kakade) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे अजित पवारांची बिनविरोध निवड झाली.

 

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यकाळात प्रथमच त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून या बँकेवर अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. खरं तर अजितदादांच्या राजकीय जीवनाची सुरुवातच याच बँकेतून झाली होती. 1999 पासून अजित पवार या बँकेचं प्रतिनिधित्व करत आहेत. आतापर्यंत 7 वेळा अजित पवारांनी बँकेचं अध्यक्षपद भूषवलं आहे. यंदाही त्यांनी बाजी मारली आहे. (PDCC Bank Election)

 

 

दरम्यान, संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी तब्बल 299 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) व
संजय जगताप (Sanjay Jagtap) यांची याआधीच बिनविरोधी निवड झाली आहे.
तर, अजित पवार यांनी अ वर्ग मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. सतीश काकडे (Satish Kakade)
यांनीही याच गटातून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे पवार यांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार की,
ते बिनविरोध होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.
अखेर सतीश काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. त्यांमुळे पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 

Web Title :- PDCC Bank Election | ncp leader ajit pawar elected unopposed in pune district bank election pdcc bank news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा