PDCC Election | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अजित पवारांचा अर्ज दाखल

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – PDCC Election | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणुकीचा (pune district bank Election) कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक (PDCC Election) प्राधिकरणाने जाहीर केला आहे. त्यानूसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा आज ‘अ’ वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

 

‘अ’ वर्ग मतदारसंघातून बारामती तालुका प्रतिनिधीकरीता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वतीने दोन अर्ज दाखल केले आहेत. याआधी नुकतेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यानंतर आता अजित पवार यांचा देखील अर्ज दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पहिल्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सतीश हरिभाऊ तावरे (Satish Haribhau Taware), अनुमोदक म्हणून दिपक मलगुंडे (Deepak Malgunde) दुस-या उमेदवारी अर्जावर अमोल गावडे (Amol Gawde) यांनी सूचक तर लालासाहेब नलवडे (Lalasaheb Nalwade) यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केलीय. (PDCC Election)

 

 

दरम्यान, 1991 पासून अजित पवार (Ajit Pawar) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (Pune District Central Election)
बँकेवर संचालक म्हणून निवडून गेलेले आहेत. या मतदारसंघात 195 मतदार आहेत.
तर, बँकेवर संचालकपदी संधी देण्याबाबत पवार हेच निर्णय घेणार आहेत.
खरंतर अजित पवार यांचे बँकेवर निर्विवाद वर्चस्व आहे.
त्यामुळे बँकेवर कोणता सदस्य निवडायचा हा अधिकार त्यांच्याकडेच असणार आहे.
सुरुवातीच्या काळात या बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनीच संभाळली आहे. तसेच ते 7 वेळा चेअरमन पदावरही होते.

 

Web Title :- PDCC Election | pune district central co operative bank election deputy chief minister ajit pawar application filed baramati

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा