अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर परभणीत पाथरी येथे शांतता समितीची बैठक

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन  – अयोध्या प्रकरणी येणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रत्येकाने शांतता पाळून सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक डी.डी. शिंदे यांनी केले. पाथरी येथे (दि. 7 नोव्हेंबर) रोजी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न झाली.

यावेळी आयोजित शांतता समितीच्या बैठकीला न.प.गटनेते तथा माजी नगराध्यक्ष जुनेद खान दुर्राणी, माजी जि.प.सदस्य दादासाहेब टेंगसे, न.प.सदस्य शाकेर सिद्दीकी, न.प.सदस्य राजीव पामे, माजी न.प.सदस्य सैफुद्दीन फारोखी, न.प.सदस्य बाबू कुरैशी, डाॅ.शिवराज नाईक, डॉ. जगदीश शिंदे, उद्धव नाईक, विश्वनाथ थोरे, अ‍ॅड. तळेकर, शिवाजी पितळे, जमियत उलेमा हिंदचे मौ.खमरुदीन, हाफेज सलिम खान, मुख्तार अली, अलोक चौधरी, साजेद राज, मौ.अब्दुल जब्बार, मौ. अल्ताफ नदवी, मौ. मुजाहीद, हाफेज इलियास, मौ.खैसर बेग, पाथरी तालुका पोलीस पाटील संघटना पदाधिकारी, आदींसह शांतता प्रेमीची उपस्थिती होती

Pathri

यावेळी पोलीस निरीक्षक डी.डी. शिंदे बोलताना म्हणाले, की अयोध्या प्रकरणी निकालावर प्रत्येकांने सामाजिक सलोखा ठेवून एकदिलाने एकमेकांशी सन्मान व प्रेमाच्या भावनेने वागावे.  ते म्हणाले तरुणांनी सोशल मिडियाचा सजगपणे वापर करावा कुठल्याही प्रकारे सामाजिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. जो कोणी सोशल मीडियाचा गैरवापर करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करील अशा व्यक्तिवर पोलीसांच्या वतीने रितसर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. समाज कंटकांच्या कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणार्‍या अनुचित प्रकाराला निवळण्यासाठी प्रशासन डोळ्यात तेल घालून सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आयोजित शांतता समितीच्या बैठकीला न.प.गटनेते जुनेद खान दुर्राणी, माजी जि.प.सदस्य दादासाहेब टेंगसे, माजी न.प.सदस्य सैफुद्दीन फारोखी, डाॅ.शिवराज नाईक, विश्वनाथ थोरे, अ‍ॅड. तळेकर, डॉ. जगदीश शिंदे आदींनी मार्गदर्शन केले.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके