…अन् सरस्वतीच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालतोय मोर, सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडीओ व्हायरल झाला झाला आहे. तो तुम्ही पाहून आनंदीत झाल्याशिवाय राहणार नाही. या सुंदर व्हिडीओमध्ये मोरांचे एक कळप विद्येची देवता, माता सरस्वतीच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालताना दिसत आहे. 4 जानेवारी रोजी हा व्हिडीओ शेअर केला असून तेंव्हापासून लाईक अन् कमेंटसचा वर्षाव होत आहे. अनेकजण आपल्या ट्विटर, व्हॉट्सॲप आणि फेसबूक अकाऊंटवरून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. हा व्हिडीओ जर्मनीमधील श्री पीठा निलय आश्रमामधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

या व्हिडीओमध्ये एका छप्परावर सरस्वतीची मूर्ती दिसत आहे. त्याठिकाणी तीन मोर फिरताना दिसत आहेत. काही वेळात हे मोर सरस्वतीच्या मूर्तीजवळ येतात आणि मूर्तीला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात करतात. हा व्हिडीओ ट्विटर युझर @Itishree001 या अकाऊंटवरून शेअर केला होता. असे सुंदर आणि मनमोहक दृश्य, सनातनची शक्ती. मोर माता सरस्वतीला प्रदक्षिणा घालताना, असे हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे. आतापर्यंत 81 हजार हून अधिक वेळा हा व्हिडीओ लाइक्स केला आहे. तसेच 13 हजारांहून अधिक लाइक्स आणि अडीच हजारांहून अधिक रिट्विट केले आहेत.