साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हाजिर हो ! आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना आठवड्यातून एक वेळा न्यायलायात हजरा रहाण्याचे निर्देश एनआय़ए विशेष न्यायालयाने दिले आहेत. सुनावणीवेळी या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतर आरोपी न्यायालयात हजर राहात नसल्याने न्यायालायने नाराजी व्यक्त करत शुक्रवारी हा निर्णय दिला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी २० मे रोजी होणार आहे.

२००८ साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी यांना याप्रकरणात एनआयए न्यायालयाने त्यांची सुटका केली. त्यानंतर याप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरु आहे. शुक्रवारी यासंदर्भात सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकराणातील एकही आरोपी सध्या न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहात नसल्याने एनआयए विशेष न्यायालयाने नाराजी व्यक्त करत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह इतर आरोपींना आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्य़ांना भोपाळमधून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.