धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई-आग्रा महामार्गावर धुळ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसने दिलेल्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना अवधान टोलनाक्याजवळ घडली.
अशोक देवराम चौधरी असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मुंबई आग्रा महामार्गावर धुळे बसस्थानकातून पुण्याकडे जाण्यासाठी शिवशाही बस निघाली होती. दरम्यान अवधान टोल नाक्याजवळील टॉप लाईन समोर रस्ता ओंलाडताणाऱ्या एका पादचाऱ्याला भरधाव शिवशाही बसने धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला लोकांनी उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. काल मध्यरात्री मंगळवारी अशोक देवराम चौधरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.