Pimpri News : कंटेनरच्या धडकेत पादचारी ठार, तर दुचाकीस्वार जखमी

पिंपरी/पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरची धडक रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन पादचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढे जाऊन कंटेनरने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात जुना पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड येथे बुधवारी सकाळी झाला.

प्रकाश दोडके (वय-57 रा. महात्मा फुले नगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. तर प्रवीण रामलिंग सांगोळी (वय-28 रा. मोहननगर, चिंचवड) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे  नाव आहे. याप्रकरणी मयत प्रकाश दोडके यांच्या पत्नी मनीषा प्रकाश दोडके (वय-45) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तू वचकल (वय-35 रा. गिरीमगाव, ता. दौंड) या कंटेनर चालकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजकुमार कंटेनर घेऊन जुना पुणे-मुंबई महामार्गावरुन पिंपरीच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. एम्पायर इस्टेट पुलाजवळ कंटेनरची धडक प्रकाश दोडके यांना बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन दोडके यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पळून जाण्याच्या नादात कंटेनर चालकाने पुढे जाऊन हॉटेल किज समोर दुचाकीला (एमएच 14 ईई 8665) धडक दिली. यामध्ये प्रवीण सांगोळी हा तरुण गंभीर जखमी झाला. पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.