मधुमेह आणि किडनी स्टोनसाठी फायदेशीर ठरतं सफरचंद ! जाणून घ्या इतर आश्चर्यकारक फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम : असं म्हणतात की, रोज एक सफरचंद खाल्लं तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही. ज्येष्ठांना आणि गर्भवती महिलांना सफरचंद खाण्याचा आवर्जून सल्ला दिला जातो. परंतु अनेकजण त्याची साल काढून त्याचं सेवन करतात. परंतु ही साल देखील आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी असते. आज आपण खास या सालीचे शरीराला काय फायदे होतात याची माहिती घेणार आहोत.

1) सफरचंद सालीसकट खाल्लं तर यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. खास करून ज्यांना मधुमेह असेल त्यांनी सालीसकट सफरचंद खाणं गरजेचं आहे.

2) सफरचंदाच्या सालीमुळं मेंदूतील पेशी लवकर खराब होत नाहीत. यामुळं बुद्धी चलाख होण्यास मदत होते. त्यामुळं सालीसकट खाल्लेलं सफरचंद फायद्याचं असतं.

3) मोतीबिंदूपासून बचाव होण्यासाठी सफरचंद सालीसकट खाल्लं तर याचा फायदा होतो. जर नियमित याचं सेवन केलं तर मोतीबिंदू होत नाही.

4) ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठीही याचा खूप फायदा होतो. कारण यात फायबर जास्त असतं. त्यामुळं शरीरातील वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही याचा खूप फायदा होतो.

5) दातांचा किडण्यापासूनही सफरचंद बचाव करतं.

6) गर्भवती महिलांमध्ये रक्तवाढीसाठी याचा फायदा होतो. त्यामुळं सालीसकट सफरचंद खाणं खूप महत्त्वाचं आहे.

7) ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांच्यासाठीही सफरचंद खाणं फायदेशीर ठरतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.