Pegasus Case | एनएसओ समूहासोबत कुठलाही व्यवहार झाला नाही; केंद्र सरकारने केलं स्पष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Pegasus Case । मागील काही दिवसापासून देशात पेगॅसस (Pegasus Case) प्रकरणावरून लोकसभेत आणि राज्यसभेत गदारोळ मांडला आहे. पावसाळी अधिवेशना (Rainy Convention) दरम्यान विरोधकांनी पेगॅसस हेरगिरी झाल्याच्या कारणावरून सरकारला सवाल केले आहेत. केंद्र सरकारकडून (Central Government) याबाबात उत्तर मिळावं यासाठी वर्धक एकवटले आहेत. मात्र आज केंद्र सरकारने पेगॅसस (Pegasus) प्रकरणावर अखेर बाजू स्पष्ट केली आहे. इस्त्रायलच्या (Israel) एनएसओ ग्रुप टेक्नॉलॉजी (NSO Group Technology) सोबत सरकारचा कुठलाही व्यवहार झालेला नसल्याचं संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defense) सोमवारी राज्यसभेत सांगितलं आहे.

एनएसओ समूह या कंपनीनं पेगॅसस (Pegasus) स्पायवेअर हे सॉफ्टवेअर विकसित केलं आहे.
यावरून डॉ. व्ही. शिवदसन यांनी यांनी राज्यसभेत केंद्र सरकारला सवाल केला आहे की,
‘एनएसओ समूह सोबत सरकारचा काही व्यवहार झाला आहे का? यावर लेखी उत्तर देताना संरक्षण मंत्रालयाने पेगॅसस स्नूपगेट प्रकरणात कुठलाही व्यवहार झाला नाही असं सांगितलं आहे.
तर, गृहमंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय अथवा कॅबिनेट सेक्रेटरीएट यांच्याकडून अजून पेगॅसस पाळत प्रकरणी कुठलंही निवेदन जाहीर केलं नाही.

 

दरम्यान, पेगॅसस (Pegasus) या हेरगिरी प्रकरणामध्ये वेगवेगळ्या विरोधीपक्ष नेत्यांचे,
न्यायाधिशांचे, वकिलांचे, सरकारवर टीकात्मक लिखाण करणाऱ्या पत्रकारांचे आणि काही
मंत्र्यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याचा दावा केला गेला आहे. दरम्यान, आज सोमवार (9 ऑगस्ट) रोजी विरोधी पक्षातील खासदारांनी राज्यसभेत या पेगॅसस प्रकरणावरुन गदारोळ उडवला आहे.
दरम्यान विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत पोस्टर्स देखील झळकावली आहेत.

 

Web Title : pegasus case | govt not any transaction with nso group dm tells rajya sabha

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM-Kisan | मोठी खुशखबर ! 9.5 शेतकर्‍यांच्या खात्यात आला 9वा हप्ता, चेक करा तुमच्या अकाऊंटमध्ये आलेले पैसा?

MP Chhatrapati Sambhaji Raje | ‘दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो, पण…,’ खा. संभाजीराजे भडकले (व्हिडीओ)

Pune Crime | जिल्हा न्यायालयाकडून अ‍ॅड. सागर ऊर्फ राजाभाऊ सुर्यवंशी फरार घोषित