Pegasus Effect | महाराष्ट्र सरकारचे फरमान, आवश्यक असेल तरच वापरा मोबाइल, अन्यथा लँडलाईनचा करा वापर

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  देशात पेगासस (pegasus) हेरगिरी प्रकरणामुळे गरमागरमीचे वातावरण आहे. या दरम्यान महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी आपल्या कर्मचार्‍यांना म्हटले की, कार्यालयीन वेळेत मोबाइल फोनचा वापर कमीत कमी करा, लँडलाईन फोन सर्वात चांगला आहे. सामान्य प्रशासन विभाग (जीएडी) द्वारे जारी एका ओदशात म्हटले आहे की, ऑफिशियल कामासाठी आवश्यक असेल तरच मोबाइल फोनचा वापर केला पाहिजे. pegasus प्रकरणामुळे सध्या राजकीय वातावरण ‘गरम’ आहे.

आदेशात म्हटले आहे की, कार्यालयात मोबाइल फोनचा (Mobile Phone) अंदाधुंद वापर सरकारची प्रतिमा बिघडवतो. जर मोबाइल फोनचा वापर करायचा असेल तर टेक्स्ट मेसेजचा जास्त वापर केला पाहिजे आणि या उपकरणांद्वारे चर्चा कमी झाली पाहिजे. कार्यालयीन वेळेत मोबाइल उपकरणांच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर मर्यादित झाला पाहिजे.

’आचार संहिता’मध्ये पुढे म्हटले आहे की, मोबाइल फोनवर व्यक्तिगत कॉलला उत्तर कार्यालयाच्या बाहेर पडल्यानंतर दिले पाहिजे.
मोबाइल फोनवर चर्चा ‘विनम्र‘ व्हावी आणि जवळपास असलेल्या लोकांना लक्षात घेऊन ‘कमी आवाजात‘ झाली पाहिजे.
मात्र, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कॉलला उत्तर उशीर न करता ताबडतोब दिले पाहिजे.

Web Title : Pegasus Effect | maharashtra govt issues guidelines for officials and employees for lesser use of cell phones

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Employees Salary Hike | खुशखबर ! भारतात पुढील वर्षी लोकांच्या सॅलरीत होऊ शकते वाढ, जाणून घ्या कारण

CoWin Portal वर स्वत: दुरूस्त करू शकता तुमचे व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट, ‘ही’ आहे अतिशय सोपी पध्दत, जाणून घ्या

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर ! जुलैच्या ‘या’ तारखेला PF अकाऊंटमध्ये येईल मोठी रक्कम, इथं चेक करा बॅलन्स